शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी, ठाणे विशेष न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 07:10 IST

याच प्रकरणामध्ये मंगेश कांबळे याला नवघर पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी १८ मार्च २०२१ रोजी ठाणे न्यायालयात झाली. त्यावेळी पीडित मुलीसह सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली.

ठाणे: एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या मंगेश कांबळे ऊर्फ पठाण (३५) याला ठाणे सत्र न्यायाधीश एस.बी. बहाळकर यांनी दहा वर्षे सक्त मजुरी, तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावासाचीही शिक्षा सुनाविली आहे. (Accused of abusing a minor girl sentenced to 10 years hard labor, Thane Special Court orders)मीरा रोड पूर्व भागातील एनजी वूड पार्क इमारतीच्या तळमजल्यावर, तसेच कांदिवली पूर्व भागातील क्रांतीनगर येथे १९ सप्टेंबर २०१५ रोजी मंगेश याने या पीडित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली १९ सप्टेंबर २०१५ रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणामध्ये मंगेश कांबळे याला नवघर पोलिसांनी अटक केली होती. या खटल्याची सुनावणी १८ मार्च २०२१ रोजी ठाणे न्यायालयात झाली. त्यावेळी पीडित मुलीसह सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार बाजू मांडली.सर्व साक्षीपुरावे ग्राह्य धरून आरोपी मंगेश याला कलम ३७६, ३५४-अ आणि पोस्को कायद्यांतर्गत दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त साध्या कैदेची शिक्षाही सुनाविली. पीडितेला नुकसानभरपाईपोटी यातील दंडाची रक्कम ही कलम ३५७ अंतर्गत देण्याचे आदेशही ठाणे न्यायालयाने दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस