लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायात ढकलणाऱ्या नारायण यादव उर्फ राजू (४१, रा. नालासोपारा, मुळ रा. झारखंड) या मुंबईतून फरार झालेल्या आरोपीला कासारवडवली पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास वाघबीळ भागातून अटक केली. त्याला मुंबईच्या डी. बी. मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सेक्स रॅकेट प्रकरणी मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल असलेला नारायण यादव हा आरोपी ठाण्यातील वाघबीळ येथील एका बारमध्ये येणार असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २३ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक खैरनार आणि सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने नारायण याला ताब्यात घेतले. त्याला २४ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सेक्स रॅकेट प्रकरणात मुंबईतून फरार झालेला आरोपी ठाण्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 23:19 IST
तरुणींना पैशांचे अमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायात ढकलणाऱ्या नारायण यादव उर्फ राजू (४१, रा. नालासोपारा, मुळ रा. झारखंड) या मुंबईतून फरार झालेल्या आरोपीला कासारवडवली पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास वाघबीळ भागातून अटक केली.
सेक्स रॅकेट प्रकरणात मुंबईतून फरार झालेला आरोपी ठाण्यात जेरबंद
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाई मुंबई पोलिसांच्या दिले ताब्यात