शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
3
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
4
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
5
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
6
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
7
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
8
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
9
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
10
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
11
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
13
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
14
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
15
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
16
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
17
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
18
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
19
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या

मुस्लिम मते, भाजपची साथ शिवसेनेच्या पथ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:15 IST

शिवसैनिकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे प्रथमच फडकला भगवा

- मुरलीधर भवार कल्याण : शिवसेना कार्यकर्त्यांची एकजूट, भाजपने दिलेली साथ आणि मुस्लिम मोहल्ल्यांतून शिवसेनेच्या पारड्यात टाकलेले मतांचे दान यामुळे कल्याण पश्चिमेत प्रथमच भगवा फडकावण्यात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना यश आले आहे. भोईर यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचे आव्हान मोडीत काढून बाजी मारली. मतदारसंघातील समस्या सोडवण्यात आलेले अपयश आणि भाजपनेही अखेरच्या क्षणी वाऱ्यावर सोडल्याने पवार यांची कोंडी झाल्याचे दिसून आले.

कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, अपक्ष नरेंद्र पवार आणि मनसेचे प्रकाश भोईर यांच्यात तिरंगी लढत झाली. प्रकाश भोईर हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ते तिसºया क्रमांकावर राहिले. शिवसेनेला ही जागा सोडली जात नसल्याने शिवसेनेने असहकाराची भूमिका घेतल्याने भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली. त्यामुळे येथे विजय मिळवणे शिवसैनिकांसाठी प्रतिष्ठेचे बनले होते. त्यामुळे ‘आता नाही तर कधीच नाही’ या ईर्षेने शिवसैनिक कामाला लागले. शिवसेनेचे भोईर राहत असलेल्या उंबर्डे, सापर्डे आणि कोलिवली या गावांतील मतदारांनी जोरदार साथ दिली.

मुस्लिम मोहल्ल्यातून शिवसेनेला झालेले मतदानही जमेची बाजू ठरली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एकही सभा न होता तसेच स्टार प्रचारक न येताही कार्यकर्त्यांच्या बळावर भोईर यांनी विजयश्री मिळवली.भाजपचे आमदार असलेल्या पवार यांना पाच वर्षांत आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची समस्या, वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्डे आदी प्रश्न मार्गी लावण्यात अपयश आले.

तसेच, त्यांची भिस्त ही भाजपने केलेल्या विकासकामांवर होती. त्यांच्या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे भूमिपूजन झाले. मात्र, बंडखोरी केल्यामुळे त्यांच्या पाठीवरचा हात पक्षाने काढून घेतल्याने त्याचे श्रेय पवार यांना घेता आले नाही. तसेच भाजपचे नगरसेवक आणि भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी महायुतीचा धर्म पाळल्यामुळे पवार एकाकी पडले.

विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार न करता वैयक्तिक पातळीवर केलेला प्रचारही पवार यांना नडल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच, पवार यांची मदार असलेल्या मुस्लिम मोहल्ल्यातील मतदारांसह पारनाका परिसरातून अपेक्षित मतदान न झाल्यामुळे पवार यांची शिटी वाजलीच नाही. या विजयामुळे प्रथमच कल्याण पश्चिमवर भगवा फडकल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कल्याण : कल्याण पश्चिमेत मतदानाची टक्केवारी घसरल्याने सर्वच उमेदवारांमध्ये धाकधूक होती. मतमोजणी सुरू होताच पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी आघाडी घेतली. त्यांनी ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत त्यांनी भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी मतमोजणीकेंद्राबाहेर जल्लोष केला.

मतमोजणीला ८.३० वाजता मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात सुरुवात झाली. मतमोजणीकेंद्रात भोईर आणि पवार हजर होते. पहिल्या फेरीतच भोईर यांनी तीन हजार मतांची आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांच्या चेहºयांवर हास्य फुलले. कार्यकर्ते बाहेर येऊ न ही बातमी देत होते, तसतसा इतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. मात्र, अन्य मतपेट्या उघडणे बाकी असल्याने मतमोजणीच्या अंतिम फेरीपर्यंत चित्र पालटेल, याची आशा पवार यांना होती. मात्र, पंधराव्या फेरीत नऊ हजार मतांची आघाडी भोईर यांना मिळाल्याने पवार यांचा धीर खचला. ही आघाडी तोडणे कठीण असल्याचे त्यांना कळून चुकले. त्यामुळे दुसºया क्रमांकासाठी मनसेचे प्रकाश भोईर आणि अपक्ष पवार यांच्या मतांमध्ये चुरस होती. दोघांची मते कधी १०० ते कधी सात ते पाच मतांच्या फरकाने कमीजास्त होत होती. जसजसे कल हाती येत होते, तसतसा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढत होता. पवार यांची घालमेल सुरू होती. मनसेचे भोईर यांचे मतमोजणी प्रतिनिधी

मतदानकेंद्रात उपस्थित होते, ते स्वत: आले नव्हते. दुपारनंतर भाजपचे कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी मतमोजणीकेंद्रात आल्या होत्या. सायंकाळी ४.३० वाजता २९ व्या फेरीअंती पवार यांनी पराभव स्वीकारला आणि ते मतमोजणीकेंद्राबाहेर पडले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार भोईर यांना हसतमुखाने विजयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शिवसेनेचे नगरसेवक सचिन बासरे यांची गळाभेट घेतली. भोईर यांनी मतमोजणीकेंद्रातून बाहेर पडल्यावर शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. तसेच दुर्गाडीदेवीचे दर्शन घेतले. हा विजय माझा नसून शिवसेनेचा आहे. शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय शक्य झाल्याची भावना भोईर यांनी व्यक्त केली. भोईर हे बाहेर येताच त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत गुलाल उधळला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-west-acकल्याण पश्चिम