शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दिवा-निळजे रेल्वेमार्गावर तरुण-तरुणीचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 19:43 IST

ठाणे : दिवा-निळजे रेल्वेमार्गावर एकवीसवर्षीय तरुण आणि सोळावर्षीय मुलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्या दोघांचे मृतदेह निळजे रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर सापडले असून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज प्राथमिक तपासात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वर्तवला आहे. या अपघातानंतर तरुणाचा मृतदेह गुरुवारी रात्री मिळून आला. तर, त्या ...

ठाणे : दिवा-निळजे रेल्वेमार्गावर एकवीसवर्षीय तरुण आणि सोळावर्षीय मुलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्या दोघांचे मृतदेह निळजे रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर सापडले असून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज प्राथमिक तपासात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वर्तवला आहे. या अपघातानंतर तरुणाचा मृतदेह गुरुवारी रात्री मिळून आला. तर, त्या परिसरात अंधार असल्याने युवतीचा मृतदेह शुक्रवारी पहाटे निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली.रोहिदास वाघे (२१) आणि गौरी यादव (१६) अशी दोघांची नावे असून ते डायघर परिसरातील वाकळण गावात राहणारे आहेत. रोहिदास हा एका कंपनीत माळीकाम करत होता. तर, गौरी नववीत शिक्षण घेत होती. गुरुवारी रात्री निळजे रेल्वेस्थानक प्रबंधकांनी अपघात झाल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना दिली. याचदरम्यान, रोहिदास याचा मृतदेह मिळून आला होता. त्याच्याकडील मोबाइल फोनमुळे त्याची ओळखही रात्रीच पटली होती. तसेच अपघाताच्या वेळी रोहिदासने हेडफोन लावला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर, शुक्रवारी पहाटे निळजे स्थानकाच्या काही अंतरावर एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना कळवण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर, काही तासांतच तिची ओळख पुढे आली. तसेच ती रात्री दुकानातून कानातील डूल आणण्यासाठी जात असल्याचे आईला सांगून घरातून बाहेर पडली होती. रात्री उशिरा मुलगी परत न आल्याने तिच्या पालकांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नसल्याने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.दरम्यान, प्राथमिक तपासात दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे अजूनही कारण समजू शकले नाही. तसेच ज्या परिसरात अपघात झाला, तेथे रात्री अंधार असल्याने तिचा मृतदेह मिळून आला नव्हता. तो सकाळी निदर्शनास आला असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेRailway Passengerरेल्वे प्रवासीAccidentअपघात