पोलीस ठाण्याच्या आवारात वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
By Admin | Updated: June 14, 2016 04:55 IST2016-06-14T04:55:43+5:302016-06-14T04:55:43+5:30
आपला मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या श्रीपाद पालणकर या ७७ वर्षीय वयोवृद्धाला नौपाडा पोलीस ठाण्याच्या आवारातच मृत्यूने कवटाळल्याची घटना सायंकाळी ७ च्या

पोलीस ठाण्याच्या आवारात वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
ठाणे : आपला मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या श्रीपाद पालणकर या ७७ वर्षीय वयोवृद्धाला नौपाडा पोलीस ठाण्याच्या आवारातच मृत्यूने कवटाळल्याची घटना सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सोमवारी सायंकाळी ते पत्नीसमवेत नौपाडा पोलीस ठाण्यात मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार करण्यासाठी आले होते. त्यांच्या पत्नी पोलीस ठाण्यात जाऊन त्रासाची तक्रार दाखल करत होत्या. तेव्हा हे वयोवृद्ध गृहस्थ पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या मंदिराजवळ बसले होते. ते उठून पोलीस ठाण्याकडे जात असताना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस हवालदाराने त्यांना उचलून पोलीस ठाण्यात नेले. परंतु, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)