शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे ठाकुर्ली स्थानकात टळला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 18:51 IST

ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी (17 फेब्रुवारी) सकाळी एका लोकलच्या मोटरमनने सिग्नल तोडल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवली - मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी (17 फेब्रुवारी) सकाळी एका लोकलच्या मोटरमनने सिग्नल तोडल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी रेल्वे फाटकादरम्यान तैनात असलेल्या आरपीएफ जवानांसह अन्य सुरक्षा रक्षकांपैकी एकाने फाटक उघडे असतानाही मोटरमन लोकल पुढे आणत असल्याने तगादा केला. तसेच मोटरमनना यासंदर्भात अशी लोकल पुढे न आणण्याचे आवाहन केले. या घटनेत कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी अपघात होता होता टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

शनिवारी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास ठाकुर्ली स्थानकादरम्यान अप जलदमार्गे येणारी एक लोकल संथगतीने रेल्वे फाटकाच्या दिशेने आली. पण त्यादरम्यान फाटक उघडे होते, दुचाकी वाहने पूर्व-पश्चिम ये-जा करत होती. त्याच वेळेत एक लोकल आली आणि सिग्नल असतानाही ती लोकल मंद गतीने पुढे आली. त्यामुळे गोंधळलेल्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ आरडाओरडा करत लोकलच्या मोटरमनकडे धाव घेत त्रागा केला. त्यावर दोघांमध्ये काही काळ शाब्दिक तणाव झाला, मात्र सुदैवानं दुर्घटना घडली नाही.

यासंदर्भात डोंबिवली आरपीएफ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिका-यांनाही एका पोलीस अधिका-याने माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पण यासंदर्भात मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाला माहिती देण्यात येते, ते काम स्थानक प्रबंधक कार्यालयामार्फत केले जात असल्याचेही सांगण्यात आले. पण तेथून मात्र या घटनेसंदर्भात माहिती वरिष्ठांना दिली आहे की नाही हे मात्र समजू शकले नाही. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे