ठाण्यातील प्रकल्पांसाठी भूसंपादनाला गती द्या, विभागीय आयुक्तांची तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 09:54 PM2021-10-21T21:54:02+5:302021-10-21T21:54:59+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे युध्द पातळीवर

Accelerate land acquisition for projects in Thane, says Divisional Commissioner | ठाण्यातील प्रकल्पांसाठी भूसंपादनाला गती द्या, विभागीय आयुक्तांची तंबी

ठाण्यातील प्रकल्पांसाठी भूसंपादनाला गती द्या, विभागीय आयुक्तांची तंबी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे युध्द पातळीवर

ठाणे : जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग, डीएफसीएल, कल्याण-कसारा रेल्वे मार्ग आणि समृध्दी महामार्ग आदी विविध विकास प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेत त्यांच्या भूसंपादनाच्या कामाला गती देण्याची तंबी कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी जिल्ह्यातील या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना गुरूवारी दिली.
                         
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज विभागीय आयुक्तांनी या प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे युध्द पातळीवर सुरू आहेत. त्यास अनुसरून या प्रकल्पांच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला अधिक गती द्यावी. या कामात येणा:या अडचणी तत्काळ दूर करा आणि भूसंपादन प्रक्रि या पूर्ण करावी. जिल्ह्यात सुरू असलेले सर्व प्रकल्प पायाभूत प्रकल्प आहेत. त्यांच्या कामांना गती यावी, यासाठी भूसंपादन वेळेत होणो आवश्यक आहे. भूसंपादना अभावी प्रकल्पाचे काम रखडू नये, यासाठी यंत्रणांनी भूसंपादनात येणाऱ्या अडचणींवर मार्ग काढावा, असे मार्गदर्शन पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले.
                         
जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग, कल्याण-कसारा रेल्वे मार्ग, समृध्दी महामार्ग आदी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांच्या कामाचा आढावा पाटील, यांनी घेऊन अधिका:यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पुनर्वसन उपायुक्त पंकज देवरे, ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, ठाण्याचे प्रांताधिकारी अविनाश शिंदे, उल्हासनगर प्रांताधिकारी जयराज कारभारी आदींसह यावेळी भिवंडी, कल्याण उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांची माहिती या आढावा बैठकीत दिली. या बैठकीला भूसंपादन उपजिल्हाधिकारी प्रशांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रेवती गायकर, आदी उपिस्थत होते.
 

Web Title: Accelerate land acquisition for projects in Thane, says Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.