तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणा-या मांत्रिकास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:42 IST2017-08-27T01:42:24+5:302017-08-27T01:42:27+5:30

तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाºया ६० वर्षीय मांत्रिकास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ठाण्यातील कळवा येथे ३ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.

The abusive mantra prisoner kidnapped by the girl | तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणा-या मांत्रिकास कारावास

तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणा-या मांत्रिकास कारावास

ठाणे : तरुणीचे अपहरण करून तिच्यावर जादूटोणा करणाºया ६० वर्षीय मांत्रिकास ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ठाण्यातील कळवा येथे ३ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
कळव्यातील एका १९ वर्षीय तरुणीस तिच्या काही मित्रांनी अंधेरी येथील बाबा सईद मोहम्मद शेख याची भेट घालून दिली होती. या मांत्रिकाने तरुणीला एवढी भुरळ घातली की, त्याच्या प्रत्येक आदेशाचे ती पालन करायची. याचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीला पळवून नेले.
याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या मांत्रिकाने तरुणीला दिल्ली, राजस्थान, अजमेर आदी ठिकाणी नेले. दरम्यान, आरोपी अंधेरी येथे त्याच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. स्थानिकांनी कारवाईस प्रचंड विरोध केला होता.
जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला अपहरणाच्या आरोपाखाली सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वयेदेखील आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

Web Title: The abusive mantra prisoner kidnapped by the girl