शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे दोन हजार निर्वासित होणार ‘भारतीय’; नागरिकत्व विधेयक मंजुरीने आशा पल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 01:47 IST

पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : देशाच्या फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजातील ९५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कल्याणजवळील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीच्या जागी वसवण्यात आले. या वसाहतीला उल्हासनदीवरून उल्हासनगर हे नाव देण्यात आले. पाकिस्तानात राहिलेल्या सिंधी बांधवांनी होत असलेल्या अत्याचारांमुळे उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आश्रय घेतला. ते एक वर्षाचा व्हिसा घेऊ न भारतात राहत असून दोन हजारांपेक्षा जास्त ही संख्या आहे. या सिंधी बांधवांना नागरिकत्व विधेयकाचा फायदा होणार असल्याने संसदेत विधेयक मंजूर होताच शहरात पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला.

दरवर्षी वाढीव व्हिसासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे निर्वासित सिंधी बांधवांना झिजवावे लागत आहे. १०० पेक्षा जास्त नागरिकात्वाचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असून एक वर्षाचा व्हिसा घेणाºया सिंधी बांधवाची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त असल्याची माहिती जय झुलेलाल संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक मंगतानी यांनी दिली. गेल्या आठवड्यात १० अर्ज चौकशीसाठी उल्हासनगर तहसील कार्यालयात आल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांनी दिली.

नागरिकांत्वाचे विधेयक मंजूर झाल्यामुळे शहरात राहणाºया दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती १९९५ पासून व्हिसावर राहत असलेल्या जलाराम दिवाणी यांनी दिली. २४ वर्षांपासून ते शहरात राहत असून नागरिकत्वाअभावी मुलांच्या शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत. तसेच घर, जमीनही खरेदी करता येत नाही. तसेच, स्वत:च्या नावाने व्यवसायही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानमधील हजारो सिंधी समाज भारताच्या आश्रयाला येणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

सिंधी समाज व्यावसायिक असल्याने देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. या सर्व लोकांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा विश्वास आमदार कुमार आयलानी आणि जय झुलेलाल संघर्ष सेवा समितीचे अध्यक्ष दीपक मंगतानी यांनी व्यक्त केली आहे.

धर्म परिवर्तनाच्या भीतीमुळे आश्रय

पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या सिंधी समाजासह विविध धर्माच्या नागरिकांवर अन्याय होत आहे. हजारो जणांचे धर्मपरिवर्तन करत असल्याचे चित्र पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे सिंधी समाजाने धर्मासाठी घरे, जमीन, संपत्ती सोडून कुटुंब आणि नातेवाइकांसह विस्थापित होणे पसंत केले. कट्टर हिंदू आणि देशभक्त असणारा सिंधी समाज देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावणार असल्याची प्रतिक्रिया मंगलानी यांनी व्यक्त केले.ंू

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकulhasnagarउल्हासनगरthaneठाणेIndiaभारतPakistanपाकिस्तानBJPभाजपा