उल्हासनगरात भांडणात मध्यस्थी करण्याला चोप 

By सदानंद नाईक | Updated: May 3, 2024 19:23 IST2024-05-03T19:22:57+5:302024-05-03T19:23:10+5:30

पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Able to mediate disputes in Ulhasnagar | उल्हासनगरात भांडणात मध्यस्थी करण्याला चोप 

उल्हासनगरात भांडणात मध्यस्थी करण्याला चोप 

उल्हासनगर : बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून झालेली हाणामारी सोडविण्यास गेलेल्याला मध्यस्थीला चोप मिळाल्याची घटना गुरवारी घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-३ शास्त्रीनगर मध्ये राहणारे राजभवन यादव हे ७ ते ८ मित्रांसह रायता येथील उल्हास नदीत आंघोळ करण्यासाठी बुधवारी सकाळी गेले होते. नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या सुरज यादव यांने मुन्ना जैस्वाल यांच्या बहिने सोबत प्रेमविवाह केला आहे. बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुन्ना जैस्वाल व सुरज यादव यांच्यात शिवीगाळ होऊन हाणामारी झाली. त्यांचे भांडण सोडविण्याची मध्यस्थी राजभवन यादव याने केली होती. या मध्यस्थीचा राग मुन्ना जैस्वाल याला आला होता. गुरवारी सकाळी १० वाजता भांडणात मध्यस्थी केले या रागातून मुन्ना जैस्वाल व अन्नू जैस्वाल यांनी राजभवन यांच्या घरी जाऊन जबर मारहाण केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जैस्वाल बंधुवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Able to mediate disputes in Ulhasnagar