शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अबब... दिव्यात जमिनीखाली दीड हजार अनधिकृत नळजोडण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 06:30 IST

ठामपाच्या शोधमोहिमेत सापडले घबाड । ३०० जोडण्या केल्या खंडित

ठाणे : दिवा भागात पाणीटंचाईवरून सध्या चांगलाच वादंग सुरू आहे. या भागाला कमी पाणीपुरवठा होतो. टँकरने पाणीपुरवठा होतो, अशी ओरड सुरू आहे. त्यामुळे यावर पालिकेने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या करत असतानाच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिव्यात चक्क सुमारे तीन ते चार फूट खोल जमिनीखाली अनधिकृत नळजोडण्या घेऊन पाणीचोरी करणाऱ्यांचे मोठे घबाड सापडले आहे. तब्बल तीन किमीपर्यंत हे जाळे पसरले असून यामध्ये तब्बल १५०० हून अधिक जोडण्यांद्वारे पाणीचोरी केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

दिवा भागाला सध्या ३० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. तो वाढवून मिळावा, यासाठीही प्रयत्न सुरूआहेत. तसेच दिवा, मुंब्रा भागांसाठी रिमॉडेलिंग योजनेचेही काम आता सुरू होत आहे. मुंब्य्रापेक्षा पाणीटंचाईचे प्रमाण दिव्यात अधिक आहे. या भागाला मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही पाणी जाते कुठे, असा प्रश्न पालिकेला सतावत होता. 

दरम्यान, मधल्या काळात पालिकेने या भागात कारवाई करून अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या होत्या. परंतु, त्यानंतरही पाणीटंचाईचा प्रश्न काही सुटू शकला नव्हता. आता मात्र पालिकेमार्फत येथील अनधिकृत नळजोडण्यांचा शोध सुरू असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भागात ४५० मीमी व्यासाची १८ इंचाची जलवाहिनी जमिनीखालून गेली आहे. त्यात अनेक भागांत तीवर टॅब मारून अनधिकृत कनेक्शन घेतल्याचे समोर आले आहे. तब्बल तीन ते चार फूट जमिनीच्या खाली हे टॅब मारल्याचे दिसून आले असून त्यावर दीड ते दोन इंचाचे कनेक्शन जोडल्याचे आढळले. ही जलवाहिनी निळजे ते आगासन अशी तीन किमीपर्यंत खोदली असून त्याखाली तब्बल १५०० हून अधिक अनधिकृत नळकनेक्शन घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

वार्षिक एक कोटी वाचलेयातील ३०० कनेक्शन मागील पाच दिवसांत खंडित केले असून उर्वरित कनेक्शनही खंडित केले जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले.हे संपूर्ण कनेक्शन खंडित केल्यानंतर या मुख्य जलवाहिनीवर सिमेंट काँक्रि ट टाकले जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.पाणीपुरवठा विभागाने ही सर्वात मोठी चोरी उघडकीस आणली असून यातून पालिकेला वार्षिक एक कोटीचा भुर्दंडसुद्धा सहन करावा लागत होता. ही कनेक्शन किती जुनी आहेत, याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका