अपहरणकर्ता आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:32 IST2019-05-26T00:32:35+5:302019-05-26T00:32:38+5:30
उसनवार घेतलेले पैसे दिले नाही, म्हणून इलेक्ट्रिशिअन असलेल्या भावाला मारहाण करून खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे.

अपहरणकर्ता आरोपी अटकेत
ठाणे : उसनवार घेतलेले पैसे दिले नाही, म्हणून इलेक्ट्रिशिअन असलेल्या भावाला मारहाण करून खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. परंतु, पोलिसांनी सतर्कतेने या अपहरणकर्त्याच्या तावडीतून इलेक्ट्रिशिअनची घोडबंदर भागातून सुटका करून आरोपीला अटक केली आहे.
रामचंद्रनगर भागातील जयेंद्र बांगर (२७) या इलेक्ट्रिीशिअनचे आरोपी हेमेंद्र साटम, रा. संभाजीनगर याने अपहरण केले होते. आरोपी साटम आणि जयेंद्र यांच्यात मागील १० वर्षांपासून ओळख होती. गुरु वारी सकाळी दोघांची भेट झाल्यानंतर आरोपीने तुझ्या भावाने माझ्याकडून एक लाख रुपये घेतले असून त्याला फोन करून बोलव आणि आजच मला पैसे दे, अशी मागणी करून मोबाइल हिसकावून त्याला मारहाण केली. त्यानंतर, आरोपीने त्याला मोटारसायकलवर बसवूनन वाघबीळ गावात नेऊन पैसे मिळत नाही, तोपर्यंत येथून जायचे नाही, अशी धमकी दिली. त्याठिकाणी आणखीन तीन ते चार जण होते.
जयेंद्रने भावाला फोन करून या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्याने वागळे इस्टेट पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ सायंकाळी ४ वाजता आरोपींच्या तावडीतून जयेंद्रची सुटका करून हेमेंद्रला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.