सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: May 9, 2023 20:13 IST2023-05-09T20:13:11+5:302023-05-09T20:13:18+5:30

पीडितेची सुटका, गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

A woman pimp who ran a sex racket was arrested | सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालाला अटक

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालाला अटक

ठाणे :ठाणे परिसरात गरीब मुलींना पैशाचे प्रलोभन दाखवून शरीरविक्रय करण्यास भाग पाडणाऱ्या महिला दलालाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक महेश पाटील यांनी मंगळवारी दिली. तिच्या तावडीतून पीडित महिलेची सुटकाही करण्यात आली आहे.

ठाणे शहर परिसरात असाहाय्य मुलींना फूस लावून सेक्स रॅकेटसाठी तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जाते, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला मिळाली हाेती. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक पाटील यांच्या पथकाने ८ मे राेजी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एसटी बस स्थानकासमाेर सापळा रचून या महिला दलालाला ताब्यात घेतले.

गेल्या काही महिन्यांपासून ही महिला ग्राहकांच्या माेबाइलवरील व्हाॅटस्ॲपवर पीडित मुलींचे फाेटाे पाठवून मुलींना ग्राहकांकडे पाठिवण्याचे काम करीत हाेती. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिलेचे आणखी काेण काेण साथीदार आहेत? तिने आणखी काेणत्या मुलींना या जाळ्यात ओढले आहे का, याचाही तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: A woman pimp who ran a sex racket was arrested

टॅग्स :thaneठाणे