रस्त्यातील खड्डे भरून आमदार राजू पाटील यांना दिली अनोखी भेट
By पंकज पाटील | Updated: September 26, 2023 15:39 IST2023-09-26T15:39:29+5:302023-09-26T15:39:41+5:30
अंबरनाथ: आमदार राजू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही फलक शहरात लावू नये असे सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या तसेच आपल्याला ...

रस्त्यातील खड्डे भरून आमदार राजू पाटील यांना दिली अनोखी भेट
अंबरनाथ: आमदार राजू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही फलक शहरात लावू नये असे सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या तसेच आपल्याला भेट द्यायची असेल तर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवा असे आदेश दिले होते त्यानुसार आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी काटई नाका अंबरनाथ या राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली.
आमदार राजू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यास सांगितले होते त्यानुसार कार्यकर्त्यांनी देखील या आदेशाचे पालन करत काटई पाईपलाईन अंबरनाथ महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली.
अंबरनाथ मनसे तालुका अध्यक्ष नकुल पावशे, उप तालुका अध्यक्ष हेमंत मढवी विभाग अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. राज्य महामार्गावरील खड्डे भरून राजू पाटील यांना वेगळी वाढदिवसाची भेट देण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला आहे.