ट्रॅकवर पडलेला दिसला टिनचा ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला
By अनिकेत घमंडी | Updated: September 2, 2022 19:24 IST2022-09-02T19:24:05+5:302022-09-02T19:24:22+5:30
मोटरमनने प्रथम गाडीलाआपत्कालीन ब्रेक लावून सुरक्षित उभी केली आणि गाडीतून खाली उतरल्यानंतर ड्रममध्ये दगड-खडी भरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

ट्रॅकवर पडलेला दिसला टिनचा ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला
डोंबिवली : 7 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गुरुवारी रोजी 15.10 वाजता सुटते. त्याचवेळी मोटरमन अशोक शर्मा यांच्या लक्षात आले की किमी 2/435 (CSMT-भायखळा दरम्यान) ट्रॅकवर एक टिनचा ड्रम पडलेला आहे, त्यांनी आपत्कालीन ब्रेक लावला पण ड्रम गाडीला धडकला आणि मोठा आवाज झाला आणि गाडी ड्रमला हिट होऊन पुढे जाऊन गाडी थांबली.
मोटरमनने प्रथम गाडीलाआपत्कालीन ब्रेक लावून सुरक्षित उभी केलीआणि गाडीतून खाली उतरल्यानंतर ड्रममध्ये दगड आणि खडी भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. गाडीचा जंपर, वायर इत्यादी तुटून पडू शकत होते. प्रवाशांच्या मदतीने ड्रम काढण्यात आला. यादरम्यान गाडी १५ मिनिटे उशिराने सुरू झाली आणि गाडी वेळेवर कल्याण स्थानकात पोहोचली. भायखळा येथील आरपीएफ, ठाणे येथे कलम १५४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटरमन अशोक कुमार शर्मा यांच्या धाडसामुळे मोठा अपघात टळला. त्यांच्या या प्रयत्नांचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.