शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद मार्गावर रॉकेल सदृश्य कच्च्या तेलाचा टँकर उलटला! टँकर चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 19:34 IST

आपत्कालीन स्थिती ओढवल्याने पोलिसांनी नियंत्रण मिळविले!

हितेन नाईकपालघर:- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका उड्डाण पुलावरून ३० हजार लिटर क्षमतेचा केरोसीन सदृश्य कच्च्या रसायनाचा भरलेला टँकर रविवारी संध्याकाळी खाली कोसळल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी विशेष काळजी घेत हा भाग निर्मनुष्य केला.ह्या अपघातात टँकर चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मस्तान नाका उड्डाणपुलाच्या गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर टँकर पुलाच्या कठड्याला धडकल्यानंतर सुमारे वीस फूट उंचीवरून पुलाच्या खाली कोसळला.अपघात ग्रस्त टँकर मधून केरोसीन सदृश्य कच्च्या तेलाची गळती सुरु झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कच्चे तेल ज्वलनशील नसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.स्थानिकांच्या मदतीने अपघातात गंभीर जखमी टँकर चालकाला बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाता नंतर अपघात ग्रस्त टँकर मधील गळती सुरु झाली होती. 30 हजार लिटर क्षमतेच्या टँकर मधून तेलाची मस्तान नाका भागातील दुकानदार, रिक्षा चालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मस्तान नाका परिसर ऑइलमय झाला होता.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून बघ्यांच्या गर्दीला हटवून परिसर निर्ममनुष्य केला.तसेच उड्डाणपुला खालील गुजरात मार्गीकेवरील वाहतूक बंद केली होती.दोन क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त टँकर रस्त्यावरून हटवण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

टॅग्स :palgharपालघरAccidentअपघात