विहंग शांतीवनच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या रहिवाशाची सुखरुप सुटका
By जितेंद्र कालेकर | Updated: April 17, 2024 17:48 IST2024-04-17T17:47:37+5:302024-04-17T17:48:09+5:30
आपत्ती व्यवस्थापनासह अग्निशमन दलाचे मदत कार्य: दहा ते १५ मिनिटांनी राजू पाटील पडले बाहेर

विहंग शांतीवनच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या रहिवाशाची सुखरुप सुटका
ठाणे: वृंदावन साेसायटीजवळील ऋतू पार्क भागातील विहंग शांतीवन या तळ अधिक नउ मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावील लिफ्टमध्ये अडकलेल्या राजू पाटील (५०, रा. सातवा मजला, विहंग शांतीवन, ठाणे ) हे रहिवासी अडकले हाेते.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने केलेल्या तातडीच्या मदतकायार्मुळे त्यांची अवघ्या काही मिनिटांमध्ये सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विहंग शांतीवनच्याच सातव्या मजल्यावर राहणारे पाटील हे १७ एप्रिल राेजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घरी सातव्या मजल्यावर जात हाेते. त्यावेळी अचानक लिफ्ट बंद पडल्यामुळे दुसऱ्या मजल्यावरच ते अडकले.
ही माहिती मिळताच रुस्तमजी अग्निशमन केद्राच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू वाहनासह धाव घेतली. साधारण १० ते १५ मिनिटांच्या अंतरामध्ये पाटील यांची या लिफ्टमधून सुखरुप सुटका करण्यात आली. या घटनेत काेणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.