शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदारांची बैठक सुरु होती, फडणवीस अचानक कसे आले...
By अजित मांडके | Updated: July 13, 2023 23:57 IST2023-07-13T23:46:22+5:302023-07-13T23:57:32+5:30
आज भिवंडी येथे भाजपच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत झाला.

शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आमदारांची बैठक सुरु होती, फडणवीस अचानक कसे आले...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीच्या काही काळानंतरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. आता त्यांच्या सोबत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समजू शकली नाही.
आज भिवंडी येथे भाजपच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत झाला. तर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या नंतर ठाणे येथील निवासात शिंदे यांच्या हजेरीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराकरिता आमदारांची बैठक होती अशी माहिती पुढे आली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे आल्याची मिळते समोर आली आहे. फडणवीस नेमके अचानक कसे आले याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
दरम्यान, सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर फडणवीस मुंबईकडे रवाना झाले आहेत.