शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हनी ट्रॅप प्रकरण! व्हिडीओ बनवून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक

By धीरज परब | Updated: May 25, 2024 17:14 IST

एका लॉज मध्ये नेऊन व्हिडीओ बनवत पैश्यांसाठी अपहरण करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या ५ जणांच्या टोळीला काशिगाव पोलिसांनी अटक केली.

मीरारोड : सुंदर तरुणीला पुढे करत एका लॉज मध्ये नेऊन व्हिडीओ बनवत पैश्यांसाठी अपहरण करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या ५ जणांच्या टोळीला काशिगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांना मंगळवार पर्यंत ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. ह्यात चार महिला आरोपी आहेत . 

मीरारोडच्या पुनमसागर कॉम्प्लेक्स मधील ऑलंपिया इमारतीत राहणारे ६० वर्षीय हिंमतलाल दानजीभाई पांडव ह्या इस्टेट एजंट ना पिंकी नावाच्या तरुणीने काम पाहिजे म्हणून कॉल केला. शांती गार्डन मध्ये एकदा भेटल्या नंतर तिने पांडव यांना वरसावे येथील हिल टॉप लॉजवर खोलीत बोलवले. पांडव हे सुरेश शहा ह्या मित्रासह रूम वर गेले. त्यावेळी पिंकी हिने त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना ती मोबाईल मधून शूटिंग काढत असल्याचे लक्षात आले . 

संशय आल्याने पांडव व शाह हे बाहेर निघाले असता पिंकी हिने तिच्या एका साथीदार तरुणीसह मिळून दोघांना धमकावत रिक्षात बसवले. रिक्षा उत्तन वरून गोराई दिशेने नेली. तेथे आणखी तीन महिला व पुरुष साथीदार होते व त्यांनी शाह आणि पांडव यांना मारहाण करत पैश्यांची मागणी केली. त्यांच्या कंदील ५ हजार रोख घेतल्या नंतर मीरारोड येथील एटीएम मध्ये नेले मात्र पैसे निघाले नाहीत. तेथून त्यांना बोरिवलीला नेले व प्रत्येकी १ लाख रुपये दुसऱ्या दिवशी सायंकाळ पर्यंत आणून द्या अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देत दोघांना पहाटे ३  च्या सुमारास पांडव यांच्या घराजवळ सोडून दिले . 

जखमी पांडव यांच्या फिर्यादी नंतर काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक अभिजित लांडे सह  उपनिरीक्षक किरण बघदाणे, ओमप्रकाश पाटील, धीरज राणे, राहुल वांकुज, मंगेश रक्षे,  उमंग चौधरी, किरण विरकर,  रिया राऊत, समृध्दी वर यांच्या पथकाने तपास सुरु केला . सीसीटीव्ही , तांत्रिक विश्लेषण आणि तपास कौशल्याच्या आधारे पिंकी उर्फ सोनाली महेंद्र महाले ( वय २८ वर्षे ) सुमन निवास, विजय नगर, नालासोपारा पूर्व ;   निशा नागेश गायकवाड ( वय ४५ वर्षे ) व तिची मुलगी दर्शना ( वय वर्षे २२ ) रा. राज एन्क्लेव्ह, दिपक हॉस्पीटल जवळ, मीरा रोड ;  दिपा रोहित प्रजापती ( वय ३८ वर्षे ) रा. दत्त निवास चाळ, नवघर गांव, भाईंदर पूर्व आणि मलीक अहमद फक्की ( वय २४ वर्षे ) रा.  गुलामी पार्क, नया नगर, मीरा रोड अश्या ५ जणांना पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर ५ तासात अटक केली . 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, निशा गायकवाड हि वेश्या व्यवसाय साठी तरुणी पुरवण्याचे काम करते व पांडव यांच्याशी तिची जुनी ओळख होती . तिनेच सोनाली उर्फ पिंकी हिला पांडव यांना कॉल करून जाळ्यात ओढून व्हिडीओ बनवून देण्यास सांगितले होते. त्या प्रमाणे सोनालीने व्हिडीओ बनवून देण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला.  त्यातूनच पांडव व शहा यांचे अपहरण , मारहाण व बलात्काराची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रकार घडला . पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत . तर आरोपींनी अश्या प्रकारे आणखी कोणाला ब्लॅकमेल केले आहे का ? याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत . 

टॅग्स :mira roadमीरा रोडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस