अंबरनाथमध्ये इमारतीच्या मीटर बॉक्सला लागली आग
By पंकज पाटील | Updated: April 13, 2023 18:15 IST2023-04-13T18:15:09+5:302023-04-13T18:15:35+5:30
अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

अंबरनाथमध्ये इमारतीच्या मीटर बॉक्सला लागली आग
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका इमारतीच्या मीटर बॉक्सला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील स्क्वेअर हाईट्स इमारतीत ही घटना घडली. या इमारतीच्या मीटर बॉक्सला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग इतकी भयंकर होती, की इमारतीच्या बेसमेंटमध्ये आगीच्या ज्वाळा दिसत होत्या.
अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत मीटर बॉक्स जळून खाक झाल्यामुळे आता या इमारतीत एक दोन दिवस तरी विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे. या इमारतीमधील सर्व फ्लॅटचे मीटर जळून खाक झाले आहेत. सोबत एक कार आणि एका स्कुटरचंही आगीच्या झळांमुळे नुकसान झाले असून नुकसान सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाही