पडलेल्या वडाच्या झाडाने दीड तास रोखला रस्ता; मोठया प्रमाणात वाहतुकी कोंडी
By अजित मांडके | Updated: July 20, 2023 21:13 IST2023-07-20T21:13:10+5:302023-07-20T21:13:15+5:30
ठाणे : उथळसर प्रभाग समिती समोर, हिंदी भवन बिल्डिंग बाजूला रस्त्यावर वडाचे मोठे झाड पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सव्वा ...

पडलेल्या वडाच्या झाडाने दीड तास रोखला रस्ता; मोठया प्रमाणात वाहतुकी कोंडी
ठाणे : उथळसर प्रभाग समिती समोर, हिंदी भवन बिल्डिंग बाजूला रस्त्यावर वडाचे मोठे झाड पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे उथळसर प्रभाग समितीकडून कॅसरमिल कडे जाणारा रस्ता अंदाजे दीड तास बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.
या घटनेची माहिती स्थानिक माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्यावर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. त्यांनी ते पडलेले झाड कापून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.