ठाण्यात पाण्याच्या टाकीत पडलेल्या श्वानाची अर्ध्यातासांनी सुखरूप सुटका
By अजित मांडके | Updated: November 6, 2023 21:29 IST2023-11-06T21:29:00+5:302023-11-06T21:29:08+5:30
महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले आहे.

ठाण्यात पाण्याच्या टाकीत पडलेल्या श्वानाची अर्ध्यातासांनी सुखरूप सुटका
ठाणे : चरईत विहिरीत पडलेल्या श्वानाची सुखरूप सुटका केल्याची घटना ताजी असताना, सोमवारी दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजण्याच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्ग या ठिकाणी झाकण नसलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या पाण्याच्या टाकीमध्ये भटका श्वान पडल्याची बाब समोर आली. त्या श्वानाची पाणी नसलेल्या २० फूट खोल टीकातून अर्ध्यातासांनी सुखरूप सुटका करण्यात ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच टाकी पडलेल्या श्वानाला काही मिनिटात सुखरूप बाहेर काढले. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून तो श्वान पडला की कोणी त्याला जाणूनबुजून टाकी धडकले हे समजू शकलेले नाही. सुदैवाने त्या श्वानाला ओमकार बागडे यांनी पाहून तातडीने त्याबाबत माहिती दिल्याने वेळीच बाहेर काढण्यात त्या श्वानाला यश आल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.