शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

ठाण्यात माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 13:52 IST

लाऊडस्पीकरच्या आवाजावरून वाद; महिला व पतीला मारहाण

ठाणे : घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील एका मैदानात गुरुवारी रात्री सुरू असलेल्या महाराष्ट्र महोत्सवातील लाऊडस्पीकरचा आवाज बंद करण्याची मागणी करणाऱ्या महिलेला काही महिलांनी स्टेजवरून खाली ओढले. माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्यासह संबंधितांनी मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. तिच्या पतीलाही मारहाण केल्याचा गुन्हा कासारवडवली पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे दाखल झाला.४१ वर्षीय महिला वास्तव्यास असलेल्या सोसायटीच्या बाजूला ठाणे महापालिकेच्या मैदानामध्ये मणेरा यांनी महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन केले होते. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजाचा त्रास होत होता. ताे बंद करण्याची विनंती या महिलेने मणेरा तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना केली. तेव्हा तेथील काही महिलांनी तिला हाताने मारहाण केली आणि नखाने चेहऱ्यावर ओरबाडले. या महिलेला स्टेजवरून खाली ओढून सुमारे १० ते १२ महिला आणि पुरुषांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आराेप आहे. मणेरा यांनी  गळा दाबून बाह्याचे जॅकेट फाडले. त्यानंतर इतर लोकांनीही मारहाण करत विनयभंग केल्याची तक्रार या महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास दाखल केली. झटापटीमध्ये सोनसाखळी गहाळ झाली असून, पतीलाही मारहाण झाल्याचे तसेच धमकी दिल्याचे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

अटकेची नोटीसकार्यक्रमाच्या ठिकाणी ही महिला आल्यानंतर तिने आधी आवाज बंद करण्याचे आवाहन केले. नंतर लाथ मारून ध्वनी यंत्रणेची तोडफोड केली. महिलांनाही धक्काबुक्की केली, अशी अदखलपात्र तक्रार तिच्याविरुद्ध मणेरा यांच्या समर्थकांनी केली. मणेरा यांना कलम ४१ नुसार अटकेची नोटीस बजावल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगthaneठाणे