एमएमआरडीएचे काम बंद पाडणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Published: March 5, 2024 08:05 PM2024-03-05T20:05:34+5:302024-03-05T20:05:44+5:30

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

A case has been registered against the former corporator of BJP who stopped the work of MMRDA | एमएमआरडीएचे काम बंद पाडणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल 

एमएमआरडीएचे काम बंद पाडणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल 

मीरारोड - घोडबंदर मार्गवरील चेणे येथे एमएमआरडीएचे काम शिवीगाळ , दमदाटी व बळजबरीने बंद पाडून कामासाठी लावलेले सेंट्रिंग काढून टाकल्या प्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी विरुद्ध काशीमीरा पोलिसांनी मंगळवारी ५ मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे.

चेणे येथील घोडबंदर मार्गावर असलेले त्यांचे हॉटेल जवळ एमएमआरडीच्या निधीतून रस्ता , वाहतूक बेट आदींचे काम सुरु आहे . भाजपाचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांचे शहरात ऑर्केस्ट्रा बार , बार , लॉज व हॉटेल आहेत . चेणे येथे देखील त्यांचे घोडबंदर मार्ग व चेणे गावात जाणाऱ्या रस्त्यावर हॉटेल असून सोमवारी त्यांनी एमएमआरडीएचे वाहतूक बेटाचे काम बंद पडले . त्यावेळी शेट्टी यांनी स्वतःचे कपडे काढून उघडे होत आमदार प्रताप सरनाईक  त्यांचे स्वीय सहायक शिवाजी नाळे यांच्यावर आरोप करत अपशब्द वापरत टीका केली . आ . सरनाईक हे आपले नुकसान करत असल्याचे सांगितले . स्वतः शेट्टी यांनीच ते सर्व त्यांच्या फेसबुक वरून लाईव्ह केले होते . 

या प्रकरणी एमएमआरडीएचे सदर काम करत असलेल्या ठेकेदाराला कडील अभियंते निहार प्रधान यांच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी विविध कलमां खाली गुन्हा दाखल केला आहे . येथील जंक्शनवर वाहतूक बेट सुशोभीकरणची भिंत बांधत असताना अरविंद शेट्टी व त्याच्या सोबत संतोष पुत्राण यांनी येऊन शिवीगाळ , दमदाटी , आरडाओरडा करत काम बंद पाडले . भिंतीच्या सेंट्रिंगचे प्लाय व सळ्या हाताने काढून फेकून दिल्या असे फिर्यादीत नमूद आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत . 

Web Title: A case has been registered against the former corporator of BJP who stopped the work of MMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.