शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधून लवकर सुटका न केल्याच्या रागातून अंध आईचे डोके आपटले भितींवर, मुलावर गुन्हा दाखल

By पंकज पाटील | Updated: May 30, 2023 19:00 IST

शेजारच्या तरुणीचे प्रेम संबधातून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात जेलमधून जामिनावर सुटलेल्या मुलाने आपला संताप स्वतःच्या आईवरच काढला आहे.

बदलापूर : शेजारच्या तरुणीचे प्रेम संबधातून अपहरण केल्याच्या गुन्ह्यात जेलमधून जामिनावर सुटलेल्या मुलाने आपला संताप स्वतःच्या आईवरच काढला आहे. आईने जेल मधून लवकर सोडविण्यासाठी मदत न केल्याच्या गैर समजुतीने आईला बेदम मारहाण करत तिचे डोके भितींवर आपटून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात जखमी अंध आई तुलतुली दास ही सून आणि आरोपी मुलासह राहते. विशेष म्हणजे जखमी आई ही अंध असून ती नोकरी करून कुटूंबाची उपजीविका चालवते. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे घर खर्चाचा भार एकट्या आईंवर पडला. त्यातच आरोपी दीपंकर याचे एका तरुणीशी प्रेम संबध निर्माण झाले होते. याच प्रेम संबधातून दोघेही घरातून पळून गेल्याने तरुणीच्या घरच्यांनी मुलीचे अपहरण केल्याची तक्रार कुळगांव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत, या दोघांचा कुळगांव पोलीस पथकाने शोध घेऊन त्यांना कर्नाटकमधून ताब्यात घेतले. त्यानंतर अपहरणाच्या गुन्ह्यात दीपंकर याला अटक करून त्याची रवानगी जेलमध्ये केली. 

दरम्यान, आरोपी दीपंकर हा जेल मधून जामिनावर सुटला असता, तो त्या मुलीला घेऊन आपल्या आई सोबत राहत होता. याच दरम्यान तो कामधंदा करत नसल्याने आईकडे पैश्यासाठी तगादा लावत असे. जर आईने पैसे दिले नाहीतर मारहाण करत होता. शिवाय आईने जेल मधून लवकर सोडविण्यासाठी मदत न केल्याच्या गैर समजुतीने आईला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. याच वादातून पुन्हा २६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आई घरात झोपली असतानाच बेदम मारहाण करत तिचे डोके भितींवर आपटून गंभीर जखमी केले. त्यानंतर आईला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना आईच्या तक्रारीवरून निर्दयी मुलावर कुळगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूर