परदेशी चलनाचे अमिष दाखवून फसवणूक ३ लाख घेऊन दिले कागदाचे बंडल
By कुमार बडदे | Updated: April 11, 2023 19:21 IST2023-04-11T19:20:55+5:302023-04-11T19:21:04+5:30
प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये डाँलर म्हणून कागदाचे बंडल बाधून दिले.

परदेशी चलनाचे अमिष दाखवून फसवणूक ३ लाख घेऊन दिले कागदाचे बंडल
मुंब्रा - वाहन चालकाला परकीय चलनाचे अमिष दाखवून त्याची ३ लाखांची अर्थिक फसवणूक केलेल्या महिलेसह तिघां विरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण येथे रहात असलेले तसेच एका खाजगी कंपनीतील कारचालक असलेल्या उपेंद्र सिंह याना दिवा शहरातील टाटा पावर लाईन रस्त्यावर एक महिला आणि २ पुरुष भेटले.
या चौघांनी ४ हजार अमेरिकन डाँलरचे सहा लाख रुपये होतात असे अमिष दाखवले आणि डॉलरच्या बदल्यात त्यांच्याकडून भारतीय चलनातील ३ लाख रुपये घेतले आणि त्यांना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये डाँलर म्हणून कागदाचे बंडल बाधून दिले. कागदाचे बदल बघताच फसवणूक झाल्याचे लक्षात आलेल्या सिंह यांनी याबाबतची तक्रार मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल केली.दाखल तक्रारी वरुन फसवणूक केलेल्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शहाजी शेळके करत आहेत.