शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांना भेटायला गेलेल्या वीटभट्टी मजुरास मालकाकडून मारहाण

By नितीन पंडित | Updated: January 9, 2024 19:45 IST

वीटभट्टी मालकाविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी: तालुक्यात वीट भट्टी वरील आदिवासी मजुरांना वेठबिगार म्हणून राबवून घेण्याच्या घटना समोर येत असतानाच तालुक्यातील वाघिवली येथील वीटभट्टी मजूर सुट्टीच्या दिवशी नजीकच्या गावात वीट भट्टीवर काम करणाऱ्या आपल्या आई-वडिलांना भेटायला गेल्याच्या रागातून वीटभट्टी मालकाने मजुरास जबर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कालू वाघ असे मारहाणीत जखमी वीटभट्टी मजुराचे नाव आहे.

तालुक्यातील वाघिवली येथील वीटभट्टी मालक दिनेश पाटील यांच्या वीटभट्टीवर वाडा तालुक्यातील जमभुळवाडी कोने या गावातील कालू वाघ आपल्या पत्नीसह काम करीत आहे.तर त्याचे आई वडील कवाड येथील बजरंग माळी यांच्या वीटभट्टीवर काम करतात. २२ डिसेंबर रोजी कालू हा कवाड येथील आपल्या आजारी असलेल्या आईला भेटायला गेला होता.याचा राग मनात ठेऊन मालक दिनेश पाटील याने कालू यास लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यामध्ये त्याच्या हाताला जबर मार लागल्याने हात सुजला होता.त्यानंतर मालकाने कवाड येथे खाजगी रुग्णालयात उपचार करून  त्यास पुन्हा कामाला जुपले.या बाबतचा त्रास असह्य झाल्याने त्याने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिल्या नंतर विवेक पंडित यांनी वीटभट्टीवर स्वतः धाव घेतली. त्यांनतर श्रमजीवी कार्यकर्त्यांनी कालूसह भिवंडी तालुका पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य तपासून वीटभट्टी मालक दिनेश पाटील या विरोधात मारहाणी सह वेठबिगार मुक्ती कायदा व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस