उल्हासनगरात एका बांगलादेशी महिलेला अटक धुनी-भांड्याची करीत होती काम

By सदानंद नाईक | Updated: April 4, 2025 18:03 IST2025-04-04T18:01:52+5:302025-04-04T18:03:48+5:30

पोलिसांनी २ मार्च रोजी तीला अटक करून बोलते केले असता, ती आशासुनी श्रीकलोश, आशासुनी पोलीस थाना, शाखिरा बांग्लादेश येथे राहणारी असल्याचे उघड झाले. 

A Bangladeshi woman was arrested in Ulhasnagar for working as a potter. | उल्हासनगरात एका बांगलादेशी महिलेला अटक धुनी-भांड्याची करीत होती काम

उल्हासनगरात एका बांगलादेशी महिलेला अटक धुनी-भांड्याची करीत होती काम

सदानंद नाईक 
उल्हासनगर :
कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन राधास्वामी सत्संग येथील राधा अपार्टमेंट इमारतीत राहणाऱ्या बांगलादेश महिलेला मध्यवर्ती पोलिसांनी बुधवारी अटक केली. महिलेचे नाव अमिना खातून हरुन गाझी उर्फ रेक्सोना उर्फ पूजा (३४) असे असून ती धुनी-भांडी करण्याचे काम करीत असल्याचे पोलीस तपासा उघड झाले. 

 उल्हासनगरात व शेजारील गावात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २५ पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना शहर गुन्हे अन्वेषण विभाग व शहर पोलिसांनी काही महिन्यात पकडून अटक केली. कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन राधास्वामी सत्संग येथील राधा अपार्टमेंट इमारती मध्ये अमिना खातून हरुन गाझी उर्फ रेक्सोना उर्फ पूजा (३४) या नावाची बांगलादेशी महिला राहत असून ती धुनी-भांड्याची काम करते. असी माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी २ मार्च रोजी तीला अटक करून बोलते केले असता, ती आशासुनी श्रीकलोश, आशासुनी पोलीस थाना, शाखिरा बांग्लादेश येथे राहणारी असल्याचे उघड झाले. 

कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय अवैध मार्गाने भारत-बांगला सीमेवरून छुप्या मार्गाने भारतीय सरहद्दीमध्ये प्रवेश करून कामाच्या शोधात उल्हासनगरात आल्याचे उघड झाले. तीच्या सोबत अन्य कोणी राहते का? तीच्या सारखे अन्य कोणी बांगलादेशी नागरिक ओळखीचे आहेत का? याचा शोध मध्यवर्ती पोलीस घेत आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A Bangladeshi woman was arrested in Ulhasnagar for working as a potter.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.