शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
4
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
5
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
6
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
7
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
8
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
9
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
10
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
11
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
12
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
13
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
14
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
15
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
16
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
17
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
18
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
19
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
20
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...

८९ संगणकचालक पगाराविना, भाजपच्या कामगार संघटनेचे सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:42 IST

संगणकचालक व लिपिक म्हणून घेतलेल्या ८९ कंत्राटी कर्मचाºयांना दरमहिना २२ हजार २५१ रुपये वेतनाप्रमाणे वर्षाला दोन कोटी २७ लाख अशी तीन वर्षे पालिकेने कंत्राटदारास दिली.

मीरा रोड : एका कंत्राटदारामार्फत पालिकेच्या सेवेत ८९ कंत्राटी संगणकचालकांना घेतले. मात्र, त्याला डावलून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारास नियमबाह्यपणे नेमण्याचा ठराव केल्याने पाच महिन्यांपासून या कंत्राटी संगणकचालकांना पगारच मिळालेला नाही. पदाधिकारी आणि अधिकारी या संगणकचालकांना कामासाठी राबवून घेत असताना पगार मात्र मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे हे संगणकचालक भाजपच्याच कामगार संघटनेचे सदस्य आहेत.मीरा-भार्इंदर महापालिकेने वाढत्या कार्यालयीन कामकाजासह वाढत्या पदाधिकाऱ्यांच्या संख्येमुळे कंत्राटावर संगणकचालक घेतले. २०१५ मध्ये त्यासाठी गणेशकृपा ट्रान्सपोर्टला तीन वर्षांसाठी कंत्राट मिळाले होते. त्याची मुदत २ डिसेंबर २०१८ रोजीच संपली. त्यामुळे डिसेंबरपासून वेतन न मिळाल्याने तसेच मुदतवाढीसाठी संगणकचालकांनी लोकप्रतिनिधी व अधिकाºयांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.संगणकचालक व लिपिक म्हणून घेतलेल्या ८९ कंत्राटी कर्मचाºयांना दरमहिना २२ हजार २५१ रुपये वेतनाप्रमाणे वर्षाला दोन कोटी २७ लाख अशी तीन वर्षे पालिकेने कंत्राटदारास दिली. यासाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षात केलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी एक कोटी ६८ लाख इतकी तरतूद शिल्लक होती.त्यामुळे डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत संगणकचालकांच्या वेतनावर होणारा ७५ लाख ६५ हजार इतका खर्च शिल्लक रकमेतून वळता करण्याचे १९ जानेवारीच्या महासभेत निश्चित केले होते. परंतु, हा ठराव करताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मात्र मूळ कंत्राटदार गणेशकृपा ट्रान्सपोर्टला मुदतवाढ देण्याऐवजी नव्याने निविदा काढावी व तोपर्यंत सैनिक इंटेलिजन्स व सिक्युरिटी यांच्याकडून आवश्यक संगणकचालक घेण्याचे नमूद केले.मूळ कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याऐवजी थेट मर्जीतील सैनिक सिक्युरिटी या कंत्राटदाराकडून संगणकचालक घेण्याचा नियमबाह्य ठराव केल्याने कायदेशीर आणि तांत्रिक पेच निर्माण झाला. डिसेंबर व जानेवारी महिन्यांचे वेतन कसेबसे संगणकचालकांना मिळाले. दुसरीकडे पालिकेने कंत्राटदारास मुदत संपल्याने काम थांबवण्याचे पत्र दिले.महासभेतील ठरावात घातलेल्या घोळामुळे फेब्रुवारीपासून जूनपर्यंतचा पगारच या ८९ कर्मचाºयांना मिळालेला नाही. पगार न मिळाल्याने घरखर्च चालवणे अवघड झाले आहे. कर्जाचे हप्ते भरणे, मुलांच्या शाळेचा खर्च भागवणे, औषधोपचाराचा खर्चही अशक्य झाला आहे.अनेकजण व्याजाने वा उसने पैसे घेऊन घरखर्च करत आहेत. ७ जून रोजी झालेल्या महासभेत ज्येष्ठ नगरसेविका रीटा शाह यांनी संगणकचालकांना पगार मिळाला नसल्याचा मुद्दा मांडला होता. तसेच जानेवारीमधील ठरावात सैनिक सिक्युरिटीच्या नावाची दुरुस्ती करून घेण्याचे सुचवले होते. तरीही, काहीच कार्यवाही झालेली नाही.लोकप्रतिनिधींना घातले साकडेमहापालिका अधिकारी, पदाधिकारी या संगणकचालकांकडून मात्र नियमित कामे करून घेत आहेत. पगार नसल्याने कर्मचाºयांनी महापौर डिम्पल मेहता, आमदार नरेंद्र मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. रवी व्यास यांना साकडे घातले आहे. आयुक्तांसह लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनेच मिळत आहेत.

टॅग्स :thaneठाणे