जिल्ह्यात कोरोनाचे ९६१ नवे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:44 IST2021-05-20T04:44:17+5:302021-05-20T04:44:17+5:30

ठाणे शहर परिसरात २२३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता १ लाख २७ हजार ८२ झाली आहे. शहरात ९ ...

961 new corona patients, 65 deaths in the district | जिल्ह्यात कोरोनाचे ९६१ नवे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे ९६१ नवे रुग्ण, ६५ जणांचा मृत्यू

ठाणे शहर परिसरात २२३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता १ लाख २७ हजार ८२ झाली आहे. शहरात ९ मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची एकूण संख्या १ हजार ८२९ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीत २१२ रुग्णांची वाढ झाली असून, २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत १३१ रुग्णांची वाढ झाली असून, ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये २५ रुग्ण सापडले असून, २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत १९ बाधित असून, ३ मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरमध्ये ११३ रुग्ण आढळले. ९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये २४ रुग्ण आढळले असून, एकाही मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये ५२ रुग्णांची नोंद झाली असून, एका मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १६२ नवे रुग्ण वाढले असून, १० जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या ३३ हजार ११८ झाली असून, आतापर्यंत ८१२ मृत्यूंची नोंद येथे झाली आहे.

Web Title: 961 new corona patients, 65 deaths in the district