ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९५९ रुग्णांची नव्याने वाढले; ३९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 09:26 PM2020-10-13T21:26:59+5:302020-10-13T21:27:10+5:30

ठाणे परिसरात २३८ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४१ हजार ४१० रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

959 new cases of corona in Thane district; 39 killed | ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९५९ रुग्णांची नव्याने वाढले; ३९ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ९५९ रुग्णांची नव्याने वाढले; ३९ जणांचा मृत्यू

Next

ठाणे: जिल्ह्यात प्रथमच मंगळवारी कोरोनाची ९५९ ही रुग्ण संख्या कमी आढळून आली आहे. आता जिल्ह्यात एक लाख ९३ हजार ९३० रुग्ण झाले आहेत. तर, आज ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या चार हजार ९१३ झाली आहे. 
 
ठाणे परिसरात २३८ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. शहरात ४१ हजार ४१० रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. मंगळवारी चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजपर्यंत एक हजार ७६ मृतांची संख्या झाली आहे. कल्याण - डोंबिवली शहरात १९६ रुग्णांची वाढ झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४६ हजार ६१२ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ९१२ वर गेली  आहे. 

उल्हासनगरात २४ नवे रुग्ण आढळले आहे. तर, एक मृत्यू झाला आहे. या शहरात नऊ हजार ६९७ रुग्ण संख्या झाली आहे,. तर, मृतांची संख्या ३१९ झालेली आहे. भिवंडी शहरात आज २९ बाधीत आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात बाधीत पाच हजार ५०९ झाले असून मृतांची संख्या ३२६ आहे. मीरा भाईंदरमध्ये १२४ रुग्णांची तर, सहा जणांच्या मृत्यूची नोंद आज केली आहे. आता बाधितांची संख्या २० हजार ६२६ झाली आहे, तर, मृतांची संख्या ६४५ पर्यंत गेली आहे. 

अंबरनाथमध्ये ३१ रुग्ण नव्याने वाढले आहे. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात बाधितांची संख्या सहा हजार ८३० झाली असून मृतांची संख्या २४९ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ३० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ७७१ झाली. या शहरात आज चार मृत्यू झाले आहेत. त्यामुळे मृत्यूची संख्या ८२ पर्यंत गेली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात ९९ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या १५ हजार ६५२ असून आतापर्यंत मृतांची संख्या ४७६ झाली आहे.

Web Title: 959 new cases of corona in Thane district; 39 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.