मुंब्य्रात ९ लाख कचराकर वसूल
By Admin | Updated: March 25, 2017 01:20 IST2017-03-25T01:20:57+5:302017-03-25T01:20:57+5:30
ठाणे महानगरपालिकेने लागू केलेल्या नवीन घनकचरा सेवा शुल्काबाबत शहरात विविध ठिकाणी गुरु वारी आंदोलने आणि प्रतिआंदोलने झाली.

मुंब्य्रात ९ लाख कचराकर वसूल
मुंब्रा : ठाणे महानगरपालिकेने लागू केलेल्या नवीन घनकचरा सेवा शुल्काबाबत शहरात विविध ठिकाणी गुरु वारी आंदोलने आणि प्रतिआंदोलने झाली. याच वेळी मुंब्रा-दिव्यातील व्यापाऱ्यांनी मात्र कर भरण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत येथील व्यापाऱ्यांनी कराचे तब्बल नऊ लाख रु पये जमा केले आहेत.
करवसुलीसाठी दुकानासमोरील कचरा न उचलण्याची मोहीम मंगळवारी प्रशासनाने सुरू केली. मात्र, यामुळे अतिसंवेदनशील मुंब्य्रातील वातावरण बिघडू नये, यासाठी मुंब्रा प्रभाग समितीचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक एन. एम. काजी यांनी घनकचरा शुल्काबाबत व्यापाऱ्यांशी शांतपणे चर्चा करून त्यांना प्रशासनाची बाजू समजावून सांगितली. त्यानुसार कर गोळा होण्यास सुरूवात होताच आयुक्तांनीही त्याला चांगला प्रतिसाद देत शुक्रवारी बाजारपेठांमधील सर्व ठिकाणचा कचरा उचलण्यात आल्याची माहिती काजी यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे करचराप्रश्नी ठाण्यापेक्षा मुंब्रा येथे वेगळे वातावरण होते. (वार्ताहर)