जिल्ह्यातील धरणांमध्ये ९५२ मिमी पाऊस
By Admin | Updated: July 6, 2016 01:53 IST2016-07-06T01:53:20+5:302016-07-06T01:53:20+5:30
मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा बारवी, आंध्रा या मोठ्या जलप्रकल्पांसह ठाणे जिल्ह्यात १७ लहान धरणांमध्ये मागील २४ तासाच्या कालावधीत प्रथमच ९५२ मिमी

जिल्ह्यातील धरणांमध्ये ९५२ मिमी पाऊस
ठाणे: मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा बारवी, आंध्रा या मोठ्या जलप्रकल्पांसह ठाणे जिल्ह्यात १७ लहान धरणांमध्ये मागील २४ तासाच्या कालावधीत प्रथमच ९५२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याशिवाय शहापूर तालुक्यातील जांभे, आदिवली, अंबरनाथचे भोज आणि मुरबाडचे धसई हे छोटे बंधारे भरल्याचे लघू पाटबंधारे विभागाने लोकमतला सांगितले.
भातसा धरणात केवळ ३१ मिमी पाऊस झाला असला तरी धरणाात ३५५.८१ दशलक्ष घनमीटर (३७.७७ टक्के) पाणीसाठा तयार झाला आहे. तर बारवी धरणात १०३ मिमी पाऊस झाला असून ४७ .२२० दलघमी. पाणीसाठा तयार झाला आहे. आंध्रा धरणात ३५ दलघमी पाणीसाठा तयार झाला असून या धरणात ४८ मिमी पाऊस पडला आहे. शिवाय कवडास यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहे. (प्रतिनिधी)