86.46%ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल

By Admin | Updated: May 26, 2016 03:15 IST2016-05-26T03:15:38+5:302016-05-26T03:15:38+5:30

बुधवारी दुपारी जाहीर झालेल्या बारावीच्या आॅनलाईन निकालात यंदा ठाणे जिल्ह्याचा निकाल ८६.४६ टक्के इतका लागला असून यंदादेखील निकालात मुलींनीच वर्चस्व राखले आहे.

86.46% of Class XII results in Thane | 86.46%ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल

86.46%ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल

बुधवारी दुपारी जाहीर झालेल्या बारावीच्या आॅनलाईन निकालात यंदा ठाणे जिल्ह्याचा निकाल ८६.४६ टक्के इतका लागला असून यंदादेखील निकालात मुलींनीच वर्चस्व राखले आहे. तर जिल्ह्यात शहापूरचा निकाल सर्वाधिक ८९.६५ टक्के इतका लागला आहे.
यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने परीक्षा घेण्यात आली होती. मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याची या निकालावर चांगलीच छाप पडली आहे. जिल्ह्यातील ८४ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यापैकी ८४ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७३ हजार १४८ उत्तीर्ण झाले. यामध्ये ३६ हजार ४४९ मुले आणि ३६ हजार ६९९ मुलींचा समावेश आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ८२.२९ आणि ९१.०४ इतके आहे.
जिल्ह्यातील रिपीटर्सचा निकाल ३९.५८ टक्के लागला आहे. यात पाच हजार ७१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी पाच हजार ६७५ जणांनी परीक्षा दिली. तर दोन हजार २४६ उत्तीर्ण झाले आहेत.

Web Title: 86.46% of Class XII results in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.