केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवीन ८५५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:42 IST2021-04-01T04:42:16+5:302021-04-01T04:42:16+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी कोरोनाचे ८५५ नवे रुग्ण आढळले असून, २४ तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ६४७ रुग्णांना ...

855 new corona patients in KDMC limits | केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवीन ८५५ रुग्ण

केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवीन ८५५ रुग्ण

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी कोरोनाचे ८५५ नवे रुग्ण आढळले असून, २४ तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ६४७ रुग्णांना उपचाराअंती बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर भर पडल्याने सध्या आठ हजार ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजमितीला कोरोनाबाधितांचा आकडा ७९ हजार १७३ वर पोहोचला आहे. त्यातील ६९ हजार २८५ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २५६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्वेत १३०, डोंबिवली पूर्वेत २७९, कल्याण पश्चिमेत २६२, डोंबिवली पश्चिमेला १२४, मांडा-टिटवाळा ४७ तर मोहने येथे १३ नवे रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी जुलैमध्ये १३ हजार ३९२ रुग्ण आढळले होते. मार्चमध्ये १४ हजार ५८९ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून, ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

-------------------

Web Title: 855 new corona patients in KDMC limits