शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

महापालिकेच्या अर्थसंकल्पात ८५ कोटींची वाढ, आता ३३८४ कोटींचं बजेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 20:34 IST

शहर विकास विभागाचे उत्पन्न स्थायी समितीने वाढविले, स्थायी समितीने अर्थसंकल्प केला मंजुर

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या ३२९९ कोटींच्या मुळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने ८५ कोटींची वाढ सुचविली आहे. या ४० कोटी ५२ लाख महसुली खर्चात तर ४४ कोटी ४८ लाख भांडवली खर्चात वाढ सुचविण्यात आली आहे. त्यानुसार शहर विकास विभागाकडून वाढीव उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महापालिकेने शहर विकास विभागाकडून ५०० कोटी ४२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. आता स्थायी समितीने त्यात ८५ कोटींची वाढ सुचविल्याने शहर विकास विभागाचे उत्पन्नाचे लक्ष हे ५८५ कोटी ४२ लाख झाले आहे. सोमवारी झालेल्या विशेष स्थायी समितीच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्प हा ३ हजार ३८४ कोटींचा झाला असून स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली आहे.          स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीने अर्थसंकल्पात काही महत्वाचे बदल सुचवले असून यामध्ये ८५ कोटींची वाढ सुचवत ३,३८४ कोटींवर बजेट अंतिम केला आहे. वाढ सुचविण्यात आलेल्या महसुली खर्चामध्ये प्रामुख्याने मोबाईल डायग्नोस्टीक व्हॅनसाठी १ कोटी, पशुजन्म नियंत्रण योजनेसाठी १ कोटी, जंतुनाशकांसाठी ५० लक्ष, महापौर चषक क्रीडास्पर्धांसाठी १ कोटी, इमारतींच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लक्ष, बीएसयुपी झोपडीधारकांना भाडे देण्यासाठी ५० लक्ष बागांची निगा व देखभालीसाठी  १ कोटी, जलवाहिन्या व जलकुंभ दुरुस्तीसाठी १ कोटी, स्मार्ट मीटर देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी, मलवाहिन्या देखभाल व दुरुस्तीसाठी१ कोटी व महापालिका शाळांमध्ये १० योग केंद्र सुरु करणेसाठी ५० लक्ष इत्यादींचा समावेश आहे.    सन २०२२-२३ मधील वाढ सुचविण्यात आलेल्या भांडवली कामांसाठी एकात्मिक उदयान विकास कार्यक्रमासाठी २ कोटी, अभ्यासिका बांधणेसाठी १ कोटी, बहुउद्देशीय इमारत बांधणेसाठी  १कोटी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी १ कोटी ७६ लक्ष, विकास आराखडयातील रस्ते नुतनीकरणासाठी ३ कोटी,युटीडब्ल्यूटी रस्त्यांसाठी १० कोटी ५० लक्ष, मैदान विकासासाठी २ कोटी, सार्वजनिक शौचालये बांधणेमध्ये ४ कोटी इत्यादी प्रमुख बाबींमध्ये वाढ सुचविण्यात आलेली आहे.महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करुन खोली 'तीच्यासाठी" ही संकल्पना राबविणेसाठी सार्वजनिक शौचालय बांधणे या लेखाशीर्षामध्ये ५० लक्ष तरतूद राखून ठेवण्यात आली आहे. स्थायी समितीचे अंदाजपत्रक तयार करतांना स्थायी समिती सदस्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल सभापती संजय भोईर यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका