शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना लुटणारा चोरटा अवघा ८३ वर्षांचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 03:01 IST

वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे

पंकज रोडेकरठाणे : वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास संपादन करुन त्यांना आपल्या सोबत मुंब्रा येथे येण्यास भाग पाडून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन तसेच अंगठी काढून घेणारा अवघा ८३ वर्षीय चोरटा विजय अधिकारी याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्यासाठी हीच पद्धत तो १९९३ साली मुंबईत राबवत होता. त्यावेळी मुंबईत पोलीस दलात काम केलेल्या अधिकाºयांना चोरट्याची ही कार्यपद्धती परिचित वाटली आणि त्याचा माग काढत ते त्याच्यापर्यंत पोहोचले.अधिकारी याच्या हाताला वयोमानानुसार कंप सुटत असतानाही, आतापर्यंत तो पोलिसांना गुंगारा देत होता. वयाची ऐंशी वर्षे उलटून गेल्यावरही गुन्हेगारीचा मार्ग न सोडणाºया या शार्विलकावर तुरुंगाची हवा खाण्याची पाळी ओढवली आहे.ठाणे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना व विशेष करुन गळ्यात चेन आणि हातात अंगठ्या असलेल्यांना अधिकारीहेरत असे. अधिकारी याचे वय पाहून समोरील व्यक्ती आदराने वागवत. नेमका त्याचाच फायदा उचलत तो त्यांना लुटत होता. कधी माझे दुकान पाहण्यासाठी चला, असा बहाण तो करीत असे किंवा कधी ठाण्यातील कौपीनेश्वर मंदिरात मला ५० हजार रुपये दान करायचे आहेत. माझ्यासोबत तुम्हीही येऊन माझ्या पुण्यकार्यात सहकार्य करा, असे सांगून अधिकारी त्या व्यक्तीला रिक्षातून मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात नेत असे. तेथील एका दुकानदाराशी ओळख असल्याचे भासवून त्यांना आत नेत असे व भीती घालून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेत असे.जुलै-आॅगस्ट महिन्यांमध्येप्रत्येकी एक तक्रार दाखलझाली होती. े ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याची ही पद्धत परिचयाची असल्याचे ठाणेनगर पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकमंदार धर्माधिकारी यांच्या लक्षात आली. मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात असताना, अशा घटना उघडकीस आल्याचे त्यांना स्मरण झाले.त्यावेळी एकाला अटक करून त्याच्याकडून नागपाडा, टीबी मार्ग, आग्रीपाडा, गावदेवी, व्ही टी रोड या पाच पोलीस ठाण्यातील २१ गुन्हे उघडकीस आणले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय सायंगावकर हे कुर्ला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असताना, कुर्ला पोलिसांनी अशाच गुन्ह्यांत अटक केली होती, याचे त्यांना स्मरण झाले. लागलीच ठाणेनगर पोलिसांनी चक्रे फिरवून आरोपीबाबत माहिती गोळा करण्यास सुरूवात केली.मुंबई पोलिसांकडून अधिकारी याची माहिती मिळाली. त्याची खातरजमा केल्यावर टिटवाळ््यातून मुसक्या आवळल्या. तक्रारदारांनी त्याला ओळखल्याने ठाण्यातील दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक जे.एम. पाटील यांच्या पथकाला यश आले आहे.

टॅग्स :ThiefचोरCrimeगुन्हाPoliceपोलिस