शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

‘बारवी’त ८३ टक्के, तर ‘आंध्रा’त ५९ टक्के पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 00:11 IST

या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले.

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर आणि ठाणे शहराच्या काही भागासह ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील आंध्रा धरणात शुक्रवारी पावसाचा जोर कमी आहे. या धरणात सध्या ५९ टक्के पाणीसाठा आहे. या धरणात गेल्या वर्षी या दिवशी १०० टक्के पाणीसाठा होता. शुक्रवारी या धरणात १९ मि.मी. पाऊस पडला तर, बारवी धरणात शुक्रवारी ८३ टक्के पाणी जमा झाले.उल्हास नदीवरील शहाडजवळील मोहने बंधारा येथून स्टेम प्राधिकरणाद्वारे मनपा, भिवंडीच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. उल्हास नदीला कर्जतजवळ भीवपुरी येथील टाटाच्या मालकीच्या या आंध्रा धरणातून पाणी सोडले जाते. यंदा अजून केवळ ५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. उल्हास नदीच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर आंध्रात धरणात पाणीसाठा तयार होईल. आजमितीस २०२ दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. बारवी धरण भरून वाहण्याकरिता त्यामध्ये अवघा १.९५ मीटर साठा होणे बाकी आहे.बारवी धरणात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास ते लवकरच भरण्याचे चिन्हे दिसत आहे. शुक्रवारी या धरण परिसरात सरासरी ८६ मि.मी. पाऊस पडला. मोडकसागर १०० टक्के तर तानसा ९९.५८ टक्के भरले आहे. याशिवाय सर्वात मोठे भातसा धरण ९२.६९ टक्के भरले आहे. या धरणात शुक्रवारी ७२ मि.मी. पाऊस झाला.जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून शहरी भागात सरासरी ४८.६ मि.मी. पाऊस झाला. ठाण्यात १७.४ मि.मी., कल्याणमध्ये ६८ मि.मी., मुरबाड ४९ मि.मी., भिवंडी ३८.६ मि.मी., शहापूर ६८.६ मि.मी. पाऊस झाला आहे.