शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याला ८०० काेटी आले, मग गेले कुठे? आ. संजय केळकर यांनी उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 08:14 IST

पालिकेत कुठेही गैरव्यवहार नसून सर्व हिशेब लागणार असल्याचा दावा

ठाणे : गेल्या पाच वर्षांत ठाणे पालिकेने ऑडिट रिपोर्टच शासनाला सादर केलेला नाही. २०० काेटींचे निरनिराळे आक्षेप आहेत. निधीचा संशयित वापर करणाऱ्या अधिकाऱ्यावर काेणतीही कारवाईच नाही. नगरविकास विभागाकडून पालिकेत सुमारे ८०० काेटींचा निधी आला. मग ताे जाताे कुठे? असा सवालच आ. संजय केळकर यांनी केला आहे. तर हा हिशेब लागणारच नाही, असा टाेला शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. दरम्यान, पालिकेत कुठेही गैरव्यवहार नसून सर्व हिशेब लागणार असल्याचा दावा शिंदेसेनेच खा. नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

काेपरीतील मल:निसारण प्रकल्पाला अलीकडेच आ. केळकर यांनी भेट दिली हाेती. मल:प्रक्रिया केंद्र सुरू करून त्याद्वारे वापरायोग्य पाणी, बायो गॅसद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प भ्रष्टाचाराच्या दुर्गंधीने प्रकाशझोतात आला.  तीन वर्षांत या कामाची एकही विट लागली नसताना कंत्राटदाराला दोन कोटी दिल्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी केला आहे. याच्या  चौकशीची मागणीही केळकर यांनी केली 

पाच वर्षांत ऑडिटच नाही

पाच वर्षांत पालिकेने ऑडिटच केले नाही.  प्रत्येक आठवड्याचे ऑडिट करतात आणि ते स्थायी समितीकडून मंजूर करतात. आता स्थायी समिती नाही. 

शिस्त आणि कार्यक्षमता येण्यासाठीच पालिकेचे लेखापरीक्षण आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी व्यक्त केले. लेखापरीक्षकांनी ७,६०५ आक्षेप घेतले आहेत. सुमारे तीन अब्ज ३७ काेटी ५३ लाख रुपयांचा हिशेबच मिळत नसून अनेक आक्षेप असल्याने आयुक्तांपर्यंत हा ऑडिट रिपाेर्ट येताे की नाही, असा आराेप देशपांडे यांनी केला आहे.

महापालिकेत कुठेही गैरव्यवहार, अनियमितता नाही. त्यामुळे सर्व हिशेब लागेल - नरेश म्हस्के, खासदार, शिंदेसेना, ठाणे

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा