शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बनावट नावाने राहणारा खुनातील आरोपी 8 वर्षांनी अटक , उल्हासनगरची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:36 IST

गुन्हे विभागाने एका खुनातील आरोपीला तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली. नाव बदलून राहणाºया अहमद करम हुसेन शहा याने आधारकार्डसह पॅनकार्ड काढून एका महिलेशी खोट्या नावाने लग्नही केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोट यांनी दिली.

उल्हासनगर : गुन्हे विभागाने एका खुनातील आरोपीला तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली. नाव बदलून राहणाºया अहमद करम हुसेन शहा याने आधारकार्डसह पॅनकार्ड काढून एका महिलेशी खोट्या नावाने लग्नही केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोट यांनी दिली.उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक बलराम टिकमदास मूलचंदानी यांचे संभाजी पवार यांच्यासोबत दुकानाच्या मालकीसंदर्भात वाद निर्माण झाले होते. पवार यांनी कपिलदेव मंडळ, फुलाराम चौधरी व अमजद करमहुसेन शहा या सहकारी मित्रांच्या मदतीने बलराम यांचे अपहरण करून २१ जानेवारी २००९ रोजी बदलापूर येथील फार्महाउसवर आणले. कागदापत्रांवर सही केली नाही, या रागातून चौघांनी त्यांचा धारदार हत्याराने हल्ला करून खून केला. तसेच मृतदेह गाडीमधून नेऊन पनवेल येथील वाकोडी जंगलात फेकून दिला.बलराम यांच्या हत्येप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर, पोलिसांनी तपासानंतर संभाजी पवार, कपिलदेव मंडळ व फुलाराम चौधरी यांना अटक केली. मात्र, अमजद करमहुसेन शहा फरार होता.शहा नगर येथे खोट्या नावाने राहत असल्याची माहिती गुन्हे विशेष विभागाला मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोट यांनी पथकाला नगर येथे पाठवून अमजद याला अटककेली.पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. अमजद याने साहिल करमहुसेन खान हे खोटे नाव धारण करून आधारकार्डसह पॅनकार्ड काढले. तसेच खोट्या नावाने एका महिलेसोबत लग्न केल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेतदिली.दुकानाच्या वादातून हत्या-संभाजी पवार व बलराम मूलचंदांनी हे दोघे व्यवसायाने बिल्डर होते. दुकानाच्या वादातून मूलचंदानी याचे अपहरण करून फार्म हाऊसवर निर्घृणपणे हत्या केली.यातील अमजद करमहुसेन शहा याने बनावट नाव धारण करून गेली आठ वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून