शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नौदलातील निवृत्त ७६ वर्षीय विद्यार्थी झाले १२ वी उत्तीर्ण   

By धीरज परब | Updated: May 6, 2025 23:53 IST

Mira Road News: मीरारोडच्या सर्वोदय संकुलात राहणारे नौदलातून निवृत्त झालेले ७६ वर्षीय विद्यार्थी गोरखनाथ मोरे हे १२ वीच्या परीक्षेत कला शाखेतून ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा मुलगा देखील नैदलातून निवृत्त झाला असून गोरखनाथ हे १९७१ च्या पाकिस्तान युद्धात तर मुलगा निलेश हे कारगिल युद्धात  देशासाठी लढले आहेत.

मीरारोड-  मीरारोडच्या सर्वोदय संकुलात राहणारे नौदलातून निवृत्त झालेले ७६ वर्षीय विद्यार्थी गोरखनाथ मोरे हे १२ वीच्या परीक्षेत कला शाखेतून ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा मुलगा देखील नैदलातून निवृत्त झाला असून गोरखनाथ हे १९७१ च्या पाकिस्तान युद्धात तर मुलगा निलेश हे कारगिल युद्धात  देशासाठी लढले आहेत.

मूळचे जळगावचे असलेले गोरखनाथ मोरे यांचा जन्म १९४७ साली झाला. ११ वी पर्यंत शिक्षण घेतल्या नंतर देशाच्या सेवेसाठी ते नौदलात सामील झाले. नौदल मध्ये सेवा बजावू लागल्याने त्यांना त्यावेळी पुढील शिक्षण घेता आले नव्हते. नौदलात ३२ वर्ष सेवा बजावल्या नंतर ते १९९७ साली निवृत्त झाले. नौदलाच्या कुलाबा येथील वसाहतीतून ते मीरारोडच्या सर्वोदय संकुलात कुटुंबासह रहायला आले. त्यांचा मुलगा निलेश हे देखील नौदलात होते व १२ वर्षां पूर्वी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांची मुलगी आरती वाडकर ह्या डॉक्टर आहेत. नायगाव पश्चिम येथे त्यांचा दवाखाना आहे.

गोरखनाथ हे एका लीगल फर्म मध्ये नोकरीला असून त्यांना काम करताना वकील होण्याची इच्छा वाटू लागली. त्यासाठी १२ वी उत्तीर्ण होणे आवश्यक होते. डॉ. आरती यांच्या दवाखान्यात नायगाव येथील ऋषि वाल्मिकी महाविद्यालयाचे संचालक रवी भाटकर हे गेले असता वडिलांना वकील व्हायचे आहे व त्यासाठी पुढील शिक्षण घ्यायचे असल्याचे डॉ. आरती यांनी सांगितले.

भाटकर यांनी त्यांना आवश्यक माहिती देत त्यांची कागदपत्रे बोर्डाच्या १२ वी परीक्षेसाठी दाखल केली. गोरखनाथ यांनी देखील काम सांभाळत घरीच अभ्यास केला. कोणतीही शिकवणी लावली नाही. मार्च २०२५ मध्ये त्यांनी वसईच्या न्यु इंग्लीश स्कुल मध्ये १२ वी बोर्डाची परीक्षा दिली. गोरखनाथ यांच्या १२ वी उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा आनांद झाला आहेच पण गोरखनाथ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांची नात काव्या हि १२ वी मध्ये गेली आहे तर नातू धैर्य व मोक्ष हे दोघे ९ वी मध्ये गेले आहे. आजोबा १२ वी झाल्याचा नातवंडांना अतिशय आंणफ झाला आहेच पण त्यांना आजोबांचे मोठे कौतुक वाटत आहे. शिकण्याची आपली पूर्वी पासून इच्छा होती. मला वकील व्हायचे आहे. त्यासाठी एमएच सीआयटीची परीक्षा देखील आपण दिल्याचे गोरखनाथ मोरे यांनी सांगितले. 

टॅग्स :mira roadमीरा रोडHSC Exam Resultबारावी निकाल