देहविक्रय करणाऱ्या ७ महिलांना अटक
By Admin | Updated: March 26, 2017 04:35 IST2017-03-26T04:35:42+5:302017-03-26T04:35:42+5:30
ठाणे रेल्वे स्टेशनसमोर कोपरी येथे सार्वजनिक ठिकाणी देहविक्रीकरिता उभ्या राहणाऱ्या ७ महिलांवर ठाणे गुन्हे

देहविक्रय करणाऱ्या ७ महिलांना अटक
ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशनसमोर कोपरी येथे सार्वजनिक ठिकाणी देहविक्रीकरिता उभ्या राहणाऱ्या ७ महिलांवर ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध (एएचटीसी) विभागाने क ारवाई केली. या कारवाईत ४ महिला बांगलादेशी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी दोघींना यापूर्वी १७ महिलांवर केलेल्या कारवाईत अटक केली होती. मात्र, त्या दोघी न्यायालयीन कोठडीतून सुटल्यानंतर पुन्हा त्याच व्यवसायाकडे वळल्याचे उघडकीस आले.
एएचटीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले की, कोपरी येथे शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पकडण्यात आलेल्या महिला सार्वजनिक रस्त्यांवर येजा करणाऱ्या लोकांना इशारे करीत होत्या. कोपरी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक उषा सुरनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलांकडून रोख १० हजार ५६० रुपये, ७ मोबाइल फोन व कागदपत्रे असा १४ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सात महिलांना न्यायालयीन कोठडी मिळाली.
सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब बर्गे, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक आर.जे. महाले, पोलीस हवालदार अविनाश बाबरेकर, विष्णू सातपुते, पोलीस नाईक विजय पवार, नवनाथ वाघमारे, उषा सुरनर, पोलीस कॉन्स्टेबल सरस्वती कांबळे यांनी कारवाई केली. (प्रतिनिधी)