उल्हासनगरात ७ लाख ६६ हजाराचा गुटखा सापडला; दोघाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 23:45 IST2022-04-25T23:43:55+5:302022-04-25T23:45:02+5:30
उल्हासनगरात पानटपरी, दुकाने आदी ठिकाणी आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याची सर्रासपणे विक्री होते.

उल्हासनगरात ७ लाख ६६ हजाराचा गुटखा सापडला; दोघाला अटक
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२ व्हाईट हाऊस शेजारी एका घरावर २३ एप्रिल रोजी दुपारी साडे तीन वाजता धाड टाकून ७ लाख ६६ हजाराचा गुटखा उल्हासनगर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
उल्हासनगरात पानटपरी, दुकाने आदी ठिकाणी आरोग्यास घातक असलेल्या गुटख्याची सर्रासपणे विक्री होते. असा आरोप सर्वस्तरातून होत आहे. दरम्यान शनिवारी २३ एप्रिल रोजी कॅम्प नं-२ परिसरातील व्हाईट हाऊस शेजारील घरात गुटख्याचा साठा ठेवल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना गुप्त बातमीदाराद्वारे मिळाली.
शनिवारी दुपारी साडे तीन वाजता पोलिसांनी धाड टाकून घरातून ७ लाख ६६ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सुरज प्रकाशलाल कुकरेजा व बच्चल प्रकाशलाल कुकरेजा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस करीत असून पोलिसांनी शहरातील चौकातील पानटपरीवर कारवाई केल्यास गुटख्याचा मोठा साठा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.