शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-सेनेच्या दोघा नगरसेवकांसह एकूण ६८ जणांवर गुन्हा दाखल, महापालिकासुद्धा आरोपीच्या पिंज-यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 20:18 IST

उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर पेणकरपाडा येथे सरकारी खाजणमध्ये अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी मंडळ अधिका-यांनी स्थानिक भाजपा व शिवसेनेचे दोन नगरसेवक, मीरा-भार्इंदर महापालिकेसह एकूण ६८ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.

मीरा रोड - उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर पेणकरपाडा येथे सरकारी खाजणमध्ये अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे केल्याप्रकरणी मंडळ अधिका-यांनी स्थानिक भाजपा व शिवसेनेचे दोन नगरसेवक, मीरा-भार्इंदर महापालिकेसह एकूण ६८ जणांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २२ फेब्रुवारी रोजी राजकिय नेते देव नाहीत व कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाहीत नसल्याचे ठणकावत महापालिका व पोलिसांना फटकारले होते. कारवाई करण्यास घाबरता का ? असा सवाल देखील केला होता.पेणकरपाडा मधील सर्वे क्र. नवीन १/१ हा सरकारी खाजण आहे. हा परिसर पाणथळ, कांदळवन व सीआरझेड बाधित आहे. सरकारी जागा असताना देखील महापालिका, स्थानिक नगरसेवक व महसूल विभागाच्या आशीर्वादाने येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात -हास करून सर्रास अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या बांधकामांना महापालिकेने पाणी, गटार, पदपथ, दिवाबत्ती आदी सुविधा पुरवतानाच कर आकारणी केली. तर वीज कंपन्यांनी वीज पुरवठा केलाय. या अनधिकृत बांधकामांविरोधात भारत मोकल या स्थानिक कार्यकर्त्याने सातत्याने तक्रारी करून देखील पालिका, महसूल विभाग थातूरमातूर कारवाई करत. पालिका तर सरकारी जागा असल्याचे सांगून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास एकीकडे हातवर करताना दुसरीकडे कर आकारणीपासून सर्व सुविधा मात्र देत आली आहे.मिरे गावचे तलाठी यांनी येथील अतिक्रमणाबाबत जुलै २०१४ व मार्च २०१६ मध्ये अहवाल दिला होता. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मात्र तहसीलदार अधिक पाटील यांनी २८ फेब्रुवारी रोजी शसकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी महसूल अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.त्या अनुषंगाने तलाठी यांनी ३ मार्च रोजी पंचनामा केला होता.  मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी सोमवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय. फिर्यादीनुसार ६८ बांधकामांशी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम करणा-या आरोपींमध्ये भाजपाचे नगरसेवक परशुराम म्हात्रे, शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्यासह मीरा-भार्इंदर महापालिकेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.परशुराम म्हात्रे यांचे कार्यालय व दुकान तर अनिता पाटील यांचे कार्यालय आहे. महापालिकेने बेकायदा वाचनालय बांधले आहे. तर बुधवारी ७ मार्च रोजी येथील अतिक्रमित बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. यामुळे सदर कारवाई टाळण्यासाठी नगरसेवकांसह संबंधितांची धावाधाव चालली आहे. विशेष म्हणजे पाटील व म्हात्रे या दोघा नगरसेवकांमधील वादंग जाहीर आहेत. पण या निमित्ताने मात्र दोन्ही नगरासेवक एकत्र आल्याचे समजते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर