गणेशोत्सव मॅरेथॉनमध्ये ६७४३ स्पर्धक
By Admin | Updated: September 26, 2015 22:27 IST2015-09-26T22:27:09+5:302015-09-26T22:27:09+5:30
जव्हार सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या मयुरेश्वर अर्ध मॅरेथॉन व रोड रेसमध्ये ६७४३ स्पर्धक सहभागी झाले होते

गणेशोत्सव मॅरेथॉनमध्ये ६७४३ स्पर्धक
जव्हार : जव्हार सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या मयुरेश्वर अर्ध मॅरेथॉन व रोड रेसमध्ये ६७४३ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात ज्ञानेश्वर मोरेने बाजी मारली. सकाळी ८ वाजता स्पर्धेला सुरवात झाली.
तत्पूर्वी सर्व स्पर्धकांची वैद्यकीय तपासणी करून धावू शकणाऱ्या पात्र स्पर्धकांची नोंदणी व चेस्ट नंबर देण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या नंतर पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांच्या हस्ते प्रारंभ झाला. ९ वषार्खालील मुले व मुली २ कि.मी. , ३ कि.मी. च्या १२ वषार्खालील मुले व मुली, १५ वषार्खालील मुले व मुली यांच्या ५ कि.मी. च्या स्पर्धांना नगराध्यक्ष संदिप वैद्य, पं. स. सभापती ज्योती भोये, प्रसिद्ध उद्योजक निलेश सांबरे, माजी नगराध्यक्ष रियाज मानियार, माजी नगरसेवक दिलीप तेंडूलकर, भा.ज.पा. महिला आघाडी च्या लता रावळ व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रमिलाताई कोकड यांच्या हस्ते झेंडे दाखवून प्रारंभ करण्यात आला. मुख्य आकर्षण असलेल्या खुल्या गटातील २१ कि.मी. स्पर्धेत पालघरसह ठाणे, नाशिक, धुळे, मुंबई येथील नामवंत धावपटूंनी सहभाग घेतला होता.
या भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी वर्ग, एस. टी., पोलीस प्रशासन यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यामुळे सर्वांचे आभार भट यांनी व्यक्त केले.
२ कि.मी. ९ वषार्खालील मुलींमध्ये अनुक्रमे अश्विनी भोये, जीगना गुरव, समिक्षा भुसारे, ९ वषार्खालील मुलांमध्ये विवेक दिवा, राजू बांबरे, कैलास किनर, ३ कि.मी. १२ वषार्खालील मुलींमध्ये अनुक्रमे प्रीती तनमोरे, भारती सापटा, विकीता रडे, मुलांमध्ये मनोज दिघे, मंगेश डंबाली, मधुकर मोरघा, ५ कि.मी. १५ वषार्खालील मुलींमध्ये अनुक्रमे श्रद्धा पारधी, नेहा फुफाने, दीपिका हिलीम व मुलांमध्ये दिनेश पठारे, जयप्रकाश यादव रोहित मोरघा यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. मॅरेथॉनचे आकर्षण असलेल्या खुल्या गटातील २१ कि.मी.च्या स्पर्धेत विजयी कोण होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. सकाळी ९ वा. स्पर्धेला सुरुवात झाली, स्पधेर्तील मार्गावर नागरिकांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. रस्ता मोकळा राहण्यासाठी स्पर्धकांना पाणी देण्यासाठी कार्यकर्ते ठिकठिकाणी उभे होते. आपत्कालीन व्यवस्थेसाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत २१ कि.मी. चे अंतर अवघ्या ५० मिनिटात पार करत ९.५५ मी. नि. ज्ञानेश्वर विठल मोरघा याने प्रथम क्रंमांक पटकाविला तर थोडया फरकाने अनुक्रमे विजय मोरघा, युवराज थेतले, काशिनाथ भोरे, जमना खरपडे यांनी दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. विजेत्यांचे व सर्व स्पर्धकांचे मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र प्रभू अभिनंदन केले. या व गेले १० दिवस झालेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना सोमवारी सायं. होणाऱ्या सोहळ्यात पुरस्कृत केले जाणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. ((वार्ताहर))