शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बारवीत ६३ टक्के पाणीसाठा; यंदा चार मीटरने पातळी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:41 IST

गेल्या वर्षी भरले होते १00 टक्के

सुरेश लोखंडे ठाणे : पाणलोट क्षेत्रातह पाऊस कमी झाल्यामुळे धरणांच्यापाणीसाठा वाढण्यास यंदा विलंब झाला. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी आजच्या दिवशी शंभर टक्के भरले होते. पण, यंदा मात्र केवळ ६३ टक्के साठा तयार झाला आहे. मात्र, या वर्षी बारवीचा पाणीसाठा चार मीटरने वाढणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच दरवाजेही बंद करावे लागणार आहेत. याच्या जय्यत तयारीस अनुसरून पाणलोट क्षेत्रातील गावपाड्यांच्या स्थलांतरासह निवास व्यवस्थेचीदेखील काळजी घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात नेहमी ६८.६० मीटर पाणी साठा केला जात आहे. परंतु, यंदापासून या धरणात चार मीटरने वाढीव म्हणजे ७२.६० मीटर पाणीसाठा होणार आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी १०१.३८ टक्के पाणीसाठा तयार होता. यंदा केवळ जुन्या क्षमतेनुसार ६३.३६ टक्के साठा तयार झाला असून वाढीव पाणीसाठ्यास अनुसरून बारवीत आतापर्यंत ४३.५८ टक्के पाणी साठवण्यात आले आहे.

घरभाड्यासह उदरनिर्वाह भत्त्याचेही वाटपधरणात पाणीसाठा वाढणार असल्यामुळे या रहिवाशांच्या निवास व्यवस्थेची समस्या उद्भवणार आहे. यावर उपाययोजना म्हणून या गावकऱ्यांना सहा हजार रूपये प्रती महिना घरभाडे मंजूर केले आहे. एवढेच नव्हे तर ११ महिन्याचे ६६ हजार रूपये घर भाडे आगाऊ देऊन उदरनिर्वाहसाठी प्रत्येक कुटुंबाला ७१ हजार ५०० रूपये भत्ता दिल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या रहिवाशांच्या घरासाठी भूखंडही मंजूर झाले आहेत. पाच कुटूंब संख्या असलेल्यांसाठी ३७० मीटर तर पाच पेक्षा जास्त असलेल्यांसाठी ७४० मीटर भूखंड मंजूर होता. पण या रहिवाश्यांच्या मागणीस अनुसरून या घराच्या भूखंडा ऐवजी पाच जणांच्या कुटुंबाच्या घरासाठी सहा लाख ६५ हजार तर पाच पेक्षा जास्त जणांच्या घरासाठी १३ लाख ३० हजार रूपये वाटप केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कातकोलीच्या पाड्यांच्या पुनर्वसनात अडसरवाढीव पाणीसाठ्यासाठी जल समाधी मिळणाºया सात गावपाड्यांचे पुनर्वसन केले जात आहे. यात शंभर टक्के बुडणाºया तोडली गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न मिटला आहे. गावठाण विकसित करून पुनर्वसन झाले आहे. याशिवाय कातकोलीच्या मुरगवाडी, गुरूवाडी, देवपाडा आण जांभूळवाडी चार चार पाड्यांच्या नागरिकांना पैसे वाटप होऊन त्यांच्या निवास व्यवस्थेचीदेखील व्यवस्था पूर्ण झाल्याचे बारवी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. परंतु, कातकोलीच्या या चार पाड्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या प्लॉट अलॉटमेंटसाठी मात्र विलंब झालेला आहे. सुमारे ३३० कुटूंब असलेल्या या पाड्यांची अंदाजे एक हजार ५०० लोकसंख्या आहे.

 

टॅग्स :DamधरणWaterपाणी