शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागडपत्रांद्वारे आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा, होम लोन घेऊन पैसे खात्यात टाकले

By पंकज पाटील | Updated: April 21, 2023 17:19 IST

धक्कादायक बाब म्हणजे एक २६ वर्षांची तरुणी ही या टोळीची मास्टरमाइंड आहे.  

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे गृहकर्ज घेत आयडीबीआय बँकेला ६३ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सात जणांच्या टोळीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक २६ वर्षांची तरुणी ही या टोळीची मास्टरमाइंड आहे.

नवी मुंबईला राहणाऱ्या दिशा पोटे यांना कामोठे इथल्या जयंत बंडोपाध्याय यांचे घर खरेदी रिसेल प्रॉपर्टी म्हणून खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांच्याच तोंडओळखीच्या रसिका नाईक, रमाकांत नाईक आणि मंदार नाईक यांनी कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून त्यांची आणि बंडोपाध्याय यांची कागदपत्रं घेतली. त्यानंतर अंबरनाथच्या आयडीबीआय बँकेत दिशा पोटे यांच्या नावाने गृहकर्जासाठी अर्ज करण्यात आला. तर दुसरीकडे ज्यांच्या खात्यात ही कर्जाची रक्कम जमा होणार होती. त्या बंडोपाध्याय यांच्या नावाने मात्र एक बनावट अकाउंट नवी मुंबईच्या आयसीआयसीआय बँकेत उघडण्यात आले.  

इकडे आयडीबीआय बँकेने दिशा पोटे यांची कागदपत्रं तपासून त्यांचे कर्ज मंजूर केले आणि कर्जाची रक्कम ही थेट बंडोपाध्याय यांच्या बनावट अकाउंटमध्ये वर्ग झाली. यानंतर सिडकोच्या एनओसीसाठी बँकेने पोटे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने बँकेने बंडोपाध्याय यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी बंडोपाध्याय यांनी आपले घर विकायचे आहे हे जरी खरे असले, तरी आपल्याला अद्याप कर्जाचे पैसे मिळालेले नसून आपले आयसीआयसीआय बँकेत अकाउंटसुद्धा नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच आयडीबीआय बँकेने अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.

तपासाची दिशा पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी नवी मुंबईच्या शब्बीर सय्यद मोहम्मद पटेल या बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडले. त्याच्या चौकशीतून रसिका नाईक, मंदार नाईक आणि रमाकांत नाईक यांचा सुगावा लागताच या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर बनावट कागदपत्रं बनवून देणारे कुणाल नानजी जोगडीया आणि किशोर प्रवीण जैन या दोघांना अटक करण्यात आली. तर सर्वात शेवटी बंडोपाध्याय म्हणून अकाउंट उघडणाऱ्या राजेंद्र वामन शेट्टी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सर्वांच्या ताब्यातून पोलिसांनी अपहार झालेल्या रकमेपैकी जवळपास ४३ लाख रुपयांचं सोनं आणि ९ मोबाईल हस्तगत केले. 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी