शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील विकास कामांसाठी ६१८ कोटींच्या वार्षिक योजनेला अखेर मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:55 IST

शहरातील सुविधांसाठी अतिरिक्त १४३ कोटी. 

ठाणे : जिल्ह्यांतील नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी विशेष अतिरिक्त १४३ कोटींच्या निधीसह राज्य शासनाने ठाणे जिल्ह्याला २०२२-२३ या जिल्हा वार्षिक योजनेच्या ६१८ कोटीं रुपयांचा निधीला सोमवारी मंजुरी दिली आहे, असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

राज्यस्तरीय बैठकीत ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४७५ कोटी रुपयांच्या नियतव्ययामध्ये या विशेष निधीची भर पडली असून आता जिल्ह्याचा एकूण नियतव्यय ६१८ कोटी रुपयांचा झाल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी म्हणून  नार्वेकर यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच १८ जानेवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत सन २०२२-२३ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी ३९५.८१ कोटी, आदिवासी क्षेत्रातील योजनांसाठी ७३.४४ कोटी आणि समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनांसाठी ७२ कोटींच्या आराखड्यास यावेळी मंजुरी दिली होती. त्यानंतर २४ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय नियोजन बैठकीत ठाणे जिल्ह्यासाठी ४७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, जिल्ह्यातील आमदार यांनी ठाणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेता अतिरीक्त निधी मिळावा अशी मागणी केली होती. 

जिल्ह्यात असलेल्या सहा महापालिका, वाढते शहरीकरण, आरोग्य सुविधा, ग्रामीण भागात जनसुविधांची कामे यासाठी वाढीव निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्री शिंदे यांनी लाऊन धरली होती. या निधी वाटपाच्या सूत्रानुसार सध्या ठाणे जिल्ह्यासाठी वाढीव ४७५ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतला होता. दरम्यान, नियोजन विभागाने २१ फेब्रुवारीच्या पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना सन २०२२-२३ या वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेचा अंतिम नियतव्यय कळविला आहे. राज्यात गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता जिल्ह्यांना नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मंजूर झालेल्या ४७५ कोटी रुपयांच्या नियतव्ययामध्ये नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी १४३ कोटी रुपयांचा विशेष अतिरिक्त निधी मिळाल्याने जिल्ह्याचा एकूण मंजूर निधी आता ६१८ कोटी इतका झाल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड