शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

घरीच उपचाराच्या अट्टाहासाने झाले 600 रुग्णांचे मृत्यू, मृत्युदर नियंत्रित ठेवण्यात यशस्वी झाल्याचा आयुक्तांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 09:11 IST

महापालिका हद्दीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १ लाख २४ हजार ५११ रुग्ण आढळले असून, त्यातील १ लाख १७ हजार १५० जणांनी कोरोनावर मात केली.

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत काही रुग्णांनी घरीच उपचार घेण्याला प्राधान्य दिले व त्रास वाढल्यावर रुग्णालयात धाव घेतली. परिणामी ३५ टक्के मृत्यू हे उशिराने रुग्णालयात रुग्ण दाखल केल्याने झाल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी केला. रुग्ण वेळेत दाखल झाले असते तर ६०० रुग्णांचे प्राण वाचवता आले असते, असे ते म्हणाले. त्यामुळे ज्यांना लक्षणे दिसत असतील अशा रुग्णांनी तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आयुक्त शर्मा यांनी हा दावा केला असला तरी ठाण्यात आतापर्यंत खासगी रुग्णालये व महापालिका कोविड सेंटरमध्ये बेड मिळत नव्हते, हे वास्तव दृष्टीआड करता येत नाही.महापालिका हद्दीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १ लाख २४ हजार ५११ रुग्ण आढळले असून, त्यातील १ लाख १७ हजार १५० जणांनी कोरोनावर मात केली. याच कालावधीत १ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला. यातील अनेक जण व्याधीग्रस्त असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. कोरोनामध्येच हृदयविकाराने अनेक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण ६० टक्के आहे. ४० टक्के मृत्यू ६० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांचे आहेत.  त्यातील काहींना मधुमेह, दमा, रक्तदाब याचा त्रास होता. पालिकेने एकही मृत्यू लपवला नसल्याचा दावाही शर्मा यांनी केला. खाजगी रुग्णालयांकडून मृतांची संख्या मिळण्यास विलंब लागत असल्याने काही वेळा संख्या अचानक वाढल्यासारखे वाटते. काही रुग्णांनी घरात पाच ते सात दिवस उपचार घेतल्यानंतर आजार बळावल्यावर ते दाखल झाले. त्यांना व्हेंटिलेटर लावावा लागतो. अशा रुग्णाला वाचवणे फार कठीण होते, असे शर्मा म्हणाले.

मृत्युदर १.४ टक्केठाण्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण चारपटीने वाढूनही मृत्यूदर १.४ टक्के म्हणजे नियंत्रित असल्याचा दावा आयुक्तांनी केला. पहिल्या लाटेत रुग्णांचे प्रमाण जास्त नव्हते. पहिल्या लाटेत मागील जुलै महिन्यात २५७ जणांचे मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्याचा विचार केल्यास हे प्रमाण २९३ एवढे होते.  त्यामुळे रुग्णसंख्या चारपटीने वाढूनही ठाणे महापालिका मृत्यूदर स्थिर ठेवण्यात यशस्वी झाल्याचा दावा शर्मा यांनी केला.

तरुणांमध्ये हॅप्पी हायपोक्सिया अधिकतरुणांना आपण घरी उपचार घेऊन कोरोनाला हरवू शकतो, असा अतिआत्मविश्वास असल्याने त्यांना हॅप्पी हायपोक्सियाचा अधिक धोका असतो. तरुणांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही त्यांची ऑक्सिजन पातळी ही ९८ पर्यंत असते; परंतु ती हळूहळू खाली येते. इथेच धोक्याची घंटा वाजते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास अचानक ऑक्सिजन पातळी ७५ च्या खाली जाते आणि अशा रुग्णांना मग रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना वाचविणे कठीण होते, त्यामुळेच मृतांमध्ये तरुणांची संख्या वाढताना दिसून येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस