काशिमीरा येथे कारवाई विरोधात दगडफेक करणाऱ्या ६ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 20:45 IST2020-03-06T20:45:31+5:302020-03-06T20:45:38+5:30
पालिकेने तोडली बेकायदे बांधकामे

काशिमीरा येथे कारवाई विरोधात दगडफेक करणाऱ्या ६ जणांना अटक
लोकमत न्युज नेटवर्क
मीरारोड - काशिमीरा येथे बेकायदा बांधकामे तोडन्यास पोलीस व बाऊंसरच्या बंदोबस्तात गेलेल्या पालिका पथकावर दगडफेक केल्या प्रकरणी चाळ माफिया मनोज चौहान सह सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे. तर पालिकेने तेथील बेकायदा खोल्यांची बांधकामे पाडुन टाकली आहेत.
ेंमाशाचा पाडा मार्ग व परिसरात इको सेंसेटिव्ह झोन, नाविकास क्षेत्रासह पालिका आरक्षण तसेच आदिवासी जमीनींवर मनोज चव्हाण आदी अन्य काही भुमाफियांनी प्रचंड प्रमाणात बेकायदा बांधकामे चालवली आहेत. प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे तसेच स्थानिक नगरसेवकां कडुन मात्र या बांधकामांना पाठीशी घातले जात असल्याचे आरोप होत आहेत. जेणे करुन या भागात दुसरी धारावी झोपडपट्टी तयार झाली आहे.
आयुक्तां कडे तक्रारी गेल्या नंतर बुधवारी बोरसे व पालिका पथक पोलीस - बाऊंसरच्या ताफ्यासह ग्रीन व्हिलेज संकुल, तलावा शेजारी उद्यानाच्या आरक्षणात सुरु असलेल्या १० - १५ खोल्यांचे बांधकाम तोडण्यास गेले असता मोठ्या प्रमाणात दगडफेक केली गेली. त्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्या नंतर मनोज चौहान सह हय्युल जमाल, राजछबील पाठक, रमजान सुलेमान शेख, अशरफ शफीक यास्मीन व सोहेल इजराईल शेख यांना अटक करण्यात आली आहे. अन्य सुमारे १० ते १२ आरोपींचा शोध सुरु आहे.
आरोपींची धरपकड पोलीस करत असतानाच दुसरीकडे महापालिकेने झालेल्या बेकायदा खोल्या पाडुन टाकल्या आहेत. परंतु सदरच्या खोल्या ह्या सिमेंट ब्लॉकने बनवलेल्या असुन सदरचे सिमेंट ब्लॉक चा सुध्दा जेसीबीने चूरा करणे आवश्यक होते. कारण सदर ब्लॉक पुन्हा बेकायदा बांधकामा साठी वापरले जातात असे नागरिकांनी बोलुन दाखवले.